कोकण

कलंबिस्त पूल लवकरच पूर्ववत

CD

कलंबिस्त पूल लवकरच पूर्ववत

शालेयमंत्री दीपक केसरकर; सरपंच सावंतांनी वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः कलंबिस्त येथील महत्त्वाकांक्षी आणि गेल्या पूरस्थितीत तुटलेल्या पुलाच्या दुरुस्तीसाठी महिनाभरात निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज दिले. कलंबिस्त गावच्या सरपंच सपना सावंत यांनी याप्रश्नी मंत्री केसरकर यांचे लक्ष वेधले. सावंत यांनी या संदर्भात मंत्री केसरकरांशी ऑनलाईन चर्चा केली. गावातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे साकडे घातले. यावेळी कलंबिस्त ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पास्ते, शाहू पास्ते, पांडुरंग पास्ते, उदय सावंत, जीवन लाड, संजीव पालकर आदी उपस्थित होते. सावंत यांनी मंत्री केसरकरांचे लक्ष वेधताना कलंबिस्त गावातील कुलदैवत सातेरी मंदिराकडे जाणारा पूल आपल्या प्रयत्नाने मंजूर होऊन तो उभारण्यात आला. अडीच कोटी खर्च करून हा पूल बांधण्यात आला; मात्र पहिल्याच पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पुलाचा अर्धा भाग तुटून गेला. त्यामुळे या भागात येजा करणाऱ्या शेतकरी व धामणमळा भागातील बहुसंख्य शेतकरी, ग्रामस्थांचे हाल झाले. याची दखल घेऊन पावसाळापूर्वी हा पूल पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी केली. तसेच गावातील शैक्षणिक, आरोग्य, रस्ते आदी मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती वजा मागणी केली. यावेळी मंत्री केसरकर यांनी निश्चितपणे पुलासाठी निधी उपलब्ध करून लवकरच येथील ग्रामस्थांची गैरसोय दूर केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे गेली काही महिने रखडलेल्या या पुलाचे काम आता मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT