कोकण

हर्णै-विधी गोरेला सुवर्णपदक

CD

rat२७२७.txt

बातमी क्र. २७ (टुडे पान २ साठी)
(टीप- दोन्ही बातम्या संक्षिप्तमध्ये घेऊ नयेत.)

फोटो ओळी
-rat२७p२१.jpg-
८५५९२
तेलंगणा ः राज्यस्तरीय स्पर्धेचे बक्षीस स्वीकारताना विधी गोरे.
--

राष्ट्रीय तायक्वॉंदो स्पर्धेत विधी गोरेला सुवर्णपदक

हर्णै, ता. २७ ः दापोलीच्या विधी गोरे या खेळाडूने ५९ किलो वजनी गटाच्या तायक्वॉंदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. तेलंगणा इथं झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिनं दापोलीचे नाव उंचावले आहे. विधी हर्णै पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार दीपक गोरे यांची कन्या आहे. तेलंगणा राज्यातील हैद्राबादमध्ये झालेल्या या स्पर्धेसाठी तिने मेहनत घेतली होती. महाराष्ट्रासाठी पदक आणणारच असा निश्चय तिने स्पर्धेला जाण्यापूर्वी केला होता. महाराष्ट्र संघाकडून खेळत असताना विधीने अंतिम सामना आसामच्या खेळाडू विरुद्ध खेळला. यामध्ये दमदार कामगिरी करत तिने ५९ किलो तायक्वॉंदो कॅडेट स्पर्धेत विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले. विधी सध्या रोटरी शाळेत आठवी कक्षामध्ये शिकत आहे. विधीने या यशाचं श्रेय आई, वडील आणि प्रशिक्षक कृणाल चव्हाण यांना दिले आहे.

---

फोटो ओळी
- ratchl२७१.jpg-
८५५९३
चिपळूण ः विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप आंब्रे.
--
रिगल चिपळूणचा हॅपी फादर्स डे प्रथम

रिगल करंडक एकांकिका स्पर्धा ; विजेत्यांचा गौरव


चिपळूण, ता. २७ ः रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित चिपळूणच्या रिगल कॉलेजमध्ये झालेल्या रिगल करंडक एकांकिका स्पर्धेत संकेत हळदे लिखित रिगल कॉलेजची हॅपी फादर्स डे या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावून रिगल करंडक जिंकला. कणकवलीच्या रिगल कॉलेजने सादर केलेल्या प्रतिशोध एकलव्याचा या एकांकिकेने द्वितीय आणि भोम येथील शिर्के उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मित्तर या एकांकिकेने तृतीय क्रमांक मिळवला.
रिगल परिवारातर्फे आयोजित रिगल अंतर्गत येणाऱ्या शाळा व महाविद्यालयांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. विविध सामाजिक विषयांवर भाष्य करीत दहाहून अधिक एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण करणारे ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप आंब्रे यांचा रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजयराव शिर्के यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. स्पर्धेच्या प्रमुख प्रा. मोनिका कारंडे यांनी संस्थेचे अध्यक्ष संजयराव शिर्के, रिगल आयटीआयचे प्राचार्य प्रा. रोहित जाधव, विभागप्रमुख प्रा. वैशाली भोसले यांचे स्वागत केले. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रिगल कॉलेज कणकवलीचा प्रणय मालवणकर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून रिगल कॉलेज चिपळूणची जुईली पडवळ, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून अमित सुकटणकर आणि प्रथमेश सावरकर याची निवड करण्यात आली. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT