कोकण

क्षत्रिय मराठा मंडळातर्फे रत्नागिरीत १० मार्चला शिवजयंती शोभायात्रा

CD

क्षत्रिय मराठा मंडळातर्फे रत्नागिरीत
१० मार्चला शिवजयंती शोभायात्रा
रत्नागिरी, ता. २५ : प्रतिवर्षाप्रमाणे येथील क्षत्रिय मराठा मंडळाच्या वतीने १० मार्चला तिथीप्रमाणे शिवजयंतीनिमित्त जयस्तंभ ते मारुती मंदिर या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक तथा शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेला सायंकाळी ५.३० वाजता जयस्तंभ येथून प्रारंभ होऊन रात्री ९ वाजता मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सांगता होईल.
या मिरवणुकरिता समाजबांधवांनी दुपारी ३.३० वाजता क्षत्रिय मराठा मंडळाच्या गोडबोले स्टॉप, सिध्दीविनायक रेसिडेन्सी येथील कार्यालयात पारंपरिक वेशभुषेत एकत्र जमावे. तेथे फेटे बांधून रत्नदुर्ग किल्ल्यावर दुचाकीवरुन पुरुष व स्त्रिया जाणार आहेत. त्यानंतर देवी भगवतीच्या मंदिरातुन शिवज्योत घेऊन जयस्तंभ येथे येतील. जयस्तंभ येथे आगमन झाल्यावर ५.३० वाजता शिवाजी महाराजांच्या पालखी मिरवणुकीला आरंभ होणार आहे.
मिरवणुकीत ढोल, ताशे, झांजपथक मर्दानी खेळ व महाराजांच्या जिवनावरील चित्ररथ यांचा समावेश असेल या शोभायात्रेमध्ये चित्ररथांचा समावेश करावयाचा असेल त्यांनी मंडळाशी संपर्क साधावयाचा आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व शिवप्रेमी व मराठा समाज बंधु - भगिनिंनी या शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन क्षत्रिय मराठा मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya: रामनवमीला रामललाचा 'सूर्याभिषेक'! दुपारी १२ वाजता सूर्यकिरणे कपाळावर चमकणार; शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा अद्भूत सोहळा!

Jalna News: रुग्णवाहिकांच्या इंधनाचा उद्‍भवणार प्रश्न; पेट्रोल पंपधारकांना क्रेडिटवर डिझेल पेट्रोल बंद झाल्याने उधारी बंद होणार

Ashok Kharat Fraud : अशोक खरात की लक्ष्मण? नाशिकच्या भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर; दहावी मार्कशीटमधील 'या' आकड्यांनी उडाली खळबळ, कसं बदललं नाव?

Ashish Shelar: ‘मराठी’साठी चित्रनाट्यगृह उभारणार, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांची घोषणा

PMP Bus: पुण्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक गतिमान; पीएमपीत १५९९ बस दाखल, मेट्रोचा २०० किलोमीटर विस्तार अर्थसंकल्पात जाहीर

SCROLL FOR NEXT