कोकण

आमदार साळवींच्या जुन्या, नव्या घरांची घेतली मोजमापे

CD

rat२७५०.txt

बातमी क्र. ५० (पान ३ साठी)

आमदार साळवींच्या घरांची घेतली मोजमापे

रत्नागिरी, ता. २७ : लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघाचे ठाकरे सेनेचे आमदार आणि उपनेते राजन साळवी यांच्यामागे रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ससेमिरा सुरूच आहे. साळवी यांच्या जुन्या, नव्या घरांची तसेच हॉटेलची मोजमापे आज घेण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्‍यांनी ही नोंद घेतली. याबाबतच अहवाल रायगड एसीबीला पाठवला जाणार आहे.
रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ठाकरे गटाचे उपनेते आमदार राजन साळवी यांची चौकशी सुरु आहे. साळवी यांच्यासोबत त्यांच्या स्वीय्य सहायकापासून ठेकेदारांचीही चौकशी सुरु आहे. त्यासाठी त्यांना वारंवार रायगड एसीबी कार्यालयात हजर राहावे लागते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही चौकशीसाठी बोलावले जाते. एकदाचे काय ते करा, मला आत टाका. परंतु कुटुंबीयांना त्रास देऊ नका,अशी संतप्त प्रतिक्रिया साळवी यांनी दिली होती. दरम्यान, लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार रत्नागिरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्‍यांनी आज प्रथम तेलीआळी येथील आमदार साळवी यांच्या जुन्या घराची व मुख्य मार्गावरील हॉटेलची मोजणी घेतली. त्यानंतर खालचीआळी परिसरातील नव्या घराचीही मापे घेण्यात आली. यावेळी आमदार साळवी यांचे मोठे बंधू दीपक साळवीही उपस्थित होते. या बाबतचा अहवाल बांधकाम विभाग एसीबी रायगडला पाठवणार आहे. सुमारे अडीच तास ही प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT