कोकण

झारापमध्ये झाड कोसळून महामार्ग दीड तास ठप्प

CD

झारापमध्ये झाड कोसळून
महामार्ग दीड तास ठप्प
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर रात्री साडेबाराच्या सुमारास भले मोठे झाड कोसळल्याने इन्सुली ते झाराप महामार्ग तब्बल अडीच तास ठप्प झाला. ही घटना झाराप-खान मोहल्ला परिसरात घडली. याबाबतची माहीती मिळताच बांधकामच्या अधिकारी अनामिका चव्हाण यांनी तत्काळ दखल घेत आपल्या सहकार्‍यांना त्या ठिकाणी पाठविले. अवघ्या काही तासांत झाड बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली.
झाराप ते सावंतवाडी या महामार्गावर खान मोहल्ला या ठिकाणी महामार्गाच्या कडेला असलेले भले मोठे झाड महामार्गावर आडवे झाले. त्यामुळे सावंतवाडीकडे येणारी आणि सावंतवाडीहून मुंबई-गोवा महामार्गाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. मध्यरात्रीच्या सुमारास प्रकार घडल्यामुळे दुर्घटना टळली. झाड रस्त्यावर कोसळल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी बांधकाम विभागाशी संपर्क साधला. कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी तत्परतेने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. महामार्गावर पडलेले झाड बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. सुमारे दीड तास वाहतूक ठप्प होती. कार्यकारी अभियंता चव्हाण यांच्या कार्यतत्परतेबद्दल वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले. सहाय्यक बांधकाम अभियंता राहुल आडोले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT