कोकण

कथक कलाविष्काराने ‘विरासत’ची रंगत वाढली

CD

rat०२११.txt

बातमी क्र. ११ (टुडे ३ साठी)

कथ्थक कलाविष्काराने ‘विरासत’मध्ये रंगत

देवरूख अॅकॅडमीचा रौप्य महोत्सव ः शिल्पा मुंगळे व शिष्यांचे सादरीकरण

साडवली, ता. २ ः देवरूख येथील ललित कला अॅकॅडमीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शिल्पा मुंगळे यांच्या संकल्पनेतून ''विरासत २०२३'' कार्यक्रम सादर झाला. यामध्ये मुंगळे आणि त्यांच्या सर्व शिष्यांनी सादर केलेल्या नृत्य, अभिनयाचे उत्कृष्ट मिश्रण रसिकांनी अनुभवले तसेच तबला-पखवाज वादनासोबत कथ्थकची जुगलबंदी खास आकर्षण ठरली.
नटेश्वरमुद्रेने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर त्रितालातील तबला-पखवाज वादनासोबत मुंगळे यांनी जुगलबंदी सादर केली. नाट्यसंगीतावर नृत्य, शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट गीतावर नृत्य सादर झाले. तरांना, गझल असे विविध प्रकारांवर एकापेक्षा एक सरस नृत्ये सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. गुरू मनीषा साठे यांच्या शिष्या मनीषा जोशी यांनी व त्यांची मुलगी रिद्धी यांनी गणेश वंदना, त्यानंतर ताल पक्षामध्ये रास ताल अशी पारंपरिक कथक नृत्यप्रस्तुती सादर केली. अभिनय अंगामध्ये भजन व रिद्धीने ठुमरी सादर केली. तरानाने कार्यक्रमाचा शेवट केला. अमोल कापसे यांनी कथ्थक कीर्तन परंपरा साकारली. भगवान विष्णूचे दशावतार आणि त्यामध्ये विठ्ठलाच्या अभंगांमधून सादर केले. त्यांनी एक आहार्य प्रस्तुती केली. साक्षात समोर विठ्ठल उभा राहिला आणि रसिक भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाले. या वेळी क्रेडाईचे अध्यक्ष अजय पित्रे, भारती पित्रे, वरुण पित्रे, मालविका पित्रे, विजय विरकर, आमदार शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, रोहन बने, युयुत्सु आर्ते, नीलेश चव्हाण, तहसीलदार सुहास थोरात, राजेंद्र महाडीक आदी उपस्थित होते. अपरांत येथे कथ्थक विषयाची दोन दिवस कार्यशाळा घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT