कोकण

पेयजल एटीएम

CD

rat०२३१.txt

बातमी क्र..३१ ( पान ५ साठी)

फोटो ओळी
-rat२p२६.jpg ः
८६३७३
सावर्डे ः ग्रामपंचायत सावर्डेमार्फत शुद्ध पेयजल एटीएमचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
---------
सावर्डे ग्रामपंचायतीत शुद्ध पेयजलाचे एटीएम

सावर्डे ः १ मार्चला चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांचा वाढदिवसानिमित्त सावर्डे ग्रामपंचायतीमार्फत जनतेला स्वच्छ आणि थंड पाणी मिळावे यासाठी १ रुपयामध्ये १ लिटर पाणी अशी सुविधा करण्यात आली. याचा आरंभ आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी माजी सभापती पूजा निकम, सावर्डेचे सरपंच समीक्षा बागवे, उपसरपंच जमीर मुल्लाजी, ग्रामविकास अधिकारी के. डी. पवार, तंटामुक्ती अध्यक्ष बाबूशेठ चव्हाण, शौकतभाई माखजनकर, सुभाष सावंत, शरद चव्हाण, अजित कोकाटे, विजय बागवे, मैनूद्दीन खलपे, कुलकर्णी, सुभाष मोहिरे, ग्रामपंचायत सर्व कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
--

फोटो ओळी
-rat२p३०.jpg ः
८६३८३
दापोली ः दहाविच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देताना गटशिक्षणाधिकारी बळवंतराव.
--
गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

दाभोळ ः दहावीच्या परीक्षेसाठी गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मुलांनो भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जा, असे सांगत शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील बारावीसाठी तालुक्यातून एकूण १ हजार ६४५ विद्यार्थी ४ परीक्षा केंद्रावर परीक्षा देत असून व दहावीसाठी २ हजार १५० विद्यार्थी ९ परीक्षा केंद्रावर परीक्षा देत आहेत. आजपासून दहावीची परीक्षा सुरू झाली असून भयमुक्त वातावरणात व कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्याच्यादृष्टीने तालुक्याचे नियोजन झाले असून तालुकास्तरावरून दोन भरारी पथके त्यासाठी कार्यरत करण्यात आली आहेत. सर्व केंद्र संचालक यांना परीक्षा सुरळीत पार पडण्याच्यादृष्टीने आवश्यक ते सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती बळवंतराव यांनी दिली आहे.
---

फोटो ओळी
- ratchl२२.jpg ः
८६४२८
चिपळूण ः गायन स्पर्धेसाठी जमलेले विद्यार्थी.
----
प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयात गायन स्पर्धा

चिपळूण ः शहरातील प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयात (कै.) सुनीता सुधाकर कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ४ थीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्थांतर्गत गायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अनुश्री भागवत हिने प्रथम, सुवेद बागवे द्वितीय तर सार्थक जंगम तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. विघ्नहर्त्या गणेशाला तू सुखकर्ता तू दुःखहर्ता या गाण्याने इशिका आग्रे हिने वंदन करून कार्यक्रमाची सुरवात केली. विद्यार्थ्यांनी अभंग, बालगीते, भावगीते, भक्तिगीते अशी विविध गीते आपल्या सुमधूर आवाजात सादर केली. कोणतेही वाद्य नसतानाही विद्यार्थ्यांनी आपली कला साध्य केली हे स्पर्धेचे खास वैशिष्ट्य होते. वरद केळकर म्हणाले, या वयात शाळा तुम्हाला संगीतक्षेत्रात पुढे नेत आहे, हे खूपच अभिमानास्पद आहे. आज मी जो तुमच्यासमोर परीक्षक म्हणून उभा आहे ते या शाळेमुळेच.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT