कोकण

बुरंबावडेत ‘जलजीवन’चा श्रीगणेशा

CD

86624
बुरंबावडे : येथील जलजीवन कामाचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांनी केले.


बुरंबावडेत ‘जलजीवन’चा श्रीगणेशा

आमदार नाईकांची उपस्थिती; ९० लाखांचा निधी मंजूर

कणकवली, ता.३ : बुरंबावडे गावातील नळपाणी योजनेसाठी ९० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांनी आज केले. बुरंबावडे गावात नळयोजनेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख, उपनेते अरुण दुधवडकर यांनी पाठपुरावा केला. तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात कामासाठी ९० लाख रूपयांचा निधी मंजूर झाल्‍याची माहिती आमदार श्री.नाईक यांनी दिली.
दरम्‍यान, बुरंबावडे बौद्धवाडी येथे जिल्हा नियोजनच्या दलित वस्ती योजनेअंतर्गत हायमास्ट मंजूर झाला होता. या हायमास्टची उभारणीही पूर्ण झाली. याचेही उद्‌घाटन बुरंबावडे सरपंच अनुष्का शिंगे यांनी केले. यावेळी बुरंबावडे गावच्या वतीने शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर आणि आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी फणसगाव विभागप्रमुख दिनेश नारकर, बुरंबावडे सरपंच अनुष्का शिंगे, कणकवली युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, सिद्धेश राणे, प्रकाश आडिवरेकर, सत्यवान नार्वेकर, विजय आडिवरेकर, बबन पारकर, नामदेव पाटणकर, रामचंद्र साळवी, जगन्नाथ साळवी, सायली साळवी, सूर्यकांत साळवी, सूर्यकांत झगडे, रमेश राणम, काशीराम साळवी आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई-उत्तर मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT