कोकण

कुडाळ पंचायत समितीचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

CD

86724
मुंबई ः शोषखड्डा मोहीमेमध्ये सर्वोकृष्ट ठरलेल्या कुडाळ पंचायत समितीचा पुरस्कार रमेश बैस व एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्विकारताना बीडीओ विजय चव्हाण. बाजूला संदीपान भुमरे, नंदकुमार, शंतुनू गोयल आदी.

कुडाळ पंचायत समितीचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

शोषखड्डा मोहीमेत काम; महाराष्ट्रात सर्वोकृष्ट

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः संपूर्ण महाराष्ट्रात शोषखड्डा मोहीमेमध्ये सर्वोकृष्ट निवड झाल्याबद्दल कुडाळ पंचायत समितीला राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देवुन गौरविण्यात आले.
राज्यात २३ हजार २९१ शोषखड्ड्यांमध्ये एकट्या कुडाळ तालुक्यात ९ हजार ३१७ असे सर्वाधिक शोषखड्डे मारण्यात आले आहेत. सर्वांगीण ग्रामसमृध्दी योजनेचा शुभारंभ आज ३ मार्चला यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पाँईट, मुंबई येथे आयोजित केला होता. यावेळी कुडाळ पंचायत समितीला राज्यपाल बैस, मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. यावेळी रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, प्रधान सचिव नंदकुमार, आयुक्त शंतुनू गोयल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी स्विकारला. यावेळी पंचायत समितीचे शेखर माळकर, राजू खेत्री, मंगेश जाधव, विनोद राणे, विलास गोसावी, दिक्षा माळकर, अमित देसाई, रुपेश चव्हाण, दिनेश सर्वेकर आदी अधिकारी उपस्थित होते. कुडाळ तालुक्यात ९ हजार ३१७ शोषखड्डे मारून पूर्ण केले आणि या प्रत्येक शोषखड्ड्यांमध्ये एका कुटुंबामागे २ हजार ५५७ अनुदान मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT