कोकण

गुहा कासव पुन्हा घरटे करण्याच्या प्रयत्नात

CD

rat३p३१.jpg-
८६६९५
रत्नागिरी ः टॅगिंग केलेल्या कासवांचे ठिकाण दर्शवणारा नकाशा.
-----------
गुहा कासव पुन्हा घरटे करण्याच्या प्रयत्नात

अभ्यासकांचा अंदाज; दोन्ही कासवांचा प्रवास उत्तरेकडे

राजेश कळंबटे ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ः गुहागर किनाऱ्यावरुन सोडण्यात आलेल्या दोन कासवांपैकी गुहा हे किनारी भागाकडे वळले असून, बागेश्री अरबी समुद्रात खोल पाण्याच्या दिशेने गेले होते. गुहा हे कासव पुन्हा घरटे करण्याच्या प्रयत्नात असल्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तविला आहे.
ऑलिव्ह रिडले टर्टल सॅटेलाइट टॅगिंग प्रकल्पांतर्गत मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, महाराष्ट्र वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्था यांच्या सहयोगातून कासवांचा अभ्यास सुरू केला आहे. गुहागर किनाऱ्यावरुन २२ फेब्रुवारीला सकाळी टॅगिंग केलेली दोन कासव समुद्रात सोडण्यात आली आहेत. त्यातील एकाचे नाव बागेश्री आणि दुसऱ्याचे गुहा असे ठेवण्यात आले आहे. त्यावर लक्ष ठेवले असून, त्याची निरीक्षणे घेण्यास सुरवात झाली आहे. समुद्रातील प्रवास सुरू झाल्यानंतर दोन्ही कासव अपेक्षेने किनाऱ्‍यापासून ३० किलोमीटर आतपर्यंत गेले. गुहा कासवाने ४५ किमी अंतर पार केले. बागेश्री वाशिष्ठी नदीच्या मुखापासून गुहागर किनाऱ्यापासून उत्तरेला सरळ १५ किमी अंतरावर होती, तर गुहा किनाऱ्यापासून १० किमी अंतरावर होते. त्यांचा प्रवास उत्तरेकडे सुरू होता. एक आठवड्यानंतर गुहा उत्तरेकडील समुद्रकिनारी परिसरात आढळून आले. ते बहुदा दुसरे घरटे करण्याच्या प्रयत्नात असल्याचा अंदाज बांधला जात आहे. ते वेळास किनाऱ्यावर कमी पाण्याच्या परिसरात विहार करताना दिसत आहे, तर बागेश्री कासव गुहाच्या तुलनेने थोडी अधिक वेगाने प्रवास करत आहे. कदाचित ते अरबी समुद्रातील योग्य प्रवाह येण्याची वाट पाहत असून, त्याचा प्रवास उत्तरेकडे सुरू राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मागील वर्षी सोडलेल्या पाच कासवांपेक्षा गुहा आणि बागेश्री या दोन्ही कासवांचा प्रवास धीम्या गतीने सुरू आहे. ती अरबी समुद्रातच आहेत. गतवर्षीही एका कासवाने दोनवेळा घरटी केली होती. यंदाही एक कासव दुसरे घरटे घालण्याची शक्यता आहे.

कोट
ऑलिव्ह रिडले कासवांची निरीक्षणे दर दिवशी घेतली जात आहेत. मागील कासवांचा संपर्क सहा महिन्यांत तुटला होता. त्यातील दोन कासवांचा संपर्क टॅगिंगमधील तांत्रिक बिघाडामुळे झाला होता. गुहागर येथून कासवे सोडून आठवडा झाला आहे.
- मानस मांजरेकर, उपसंचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT