कोकण

मराठी गौरव गीत स्पर्धेत मृण्मयी आरोलकर प्रथम

CD

86868
मालवण ः खुल्या मराठी भाषा गौरव गीत स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

मराठी गौरव गीत स्पर्धेत
मृण्मयी आरोलकर प्रथम
मालवण, ता. ४ : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत येथील नगर वाचन मंदिरच्यावतीने ग्रंथालयात नव्याने दाखल झालेल्या विविध विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन नुकतेच ग्रंथालयाच्या वाचन कक्षामध्ये आयोजित करण्यात आले. यानिमित्त घेतलेल्या मराठी भाषा गौरव गीत स्पर्धेत मृण्मयी आरोलकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खुल्या मराठी भाषा गौरव गीत स्पर्धेचे आयोजन ग्रंथालयाच्या सभागृहात केले होते. या स्पर्धेमध्ये मालवण शहर व परिसरातील स्पर्धक सहभागी झाले.
श्री देवी सरस्वती तसेच कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. यावेळी परीक्षक प्रफुल्ल रेवणकर, प्रवीण पारकर संगीत साथ मंगेश कदम, विजय बोवलेकर, ग्रंथपाल संजय शिंदे उपस्थित होते. श्लोक सामंत या बालगायकाच्या ‘स्थान मानाचं देऊ मराठीला’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीतही सादर करण्यात आले. यामध्ये स्पर्धेचे परीक्षक रेवणकर, पारकर व ग्रंथालयाचा कर्मचारी वर्ग सहभागी झाला. स्पर्धेमध्ये ‘ही मायभूमी’, ‘माझ्या मराठीची गोडी’, ‘लाभले आम्हांस भाग्य’, ‘वंदे मराठी’, ‘माझ्या मराठी मातीचा’, ‘हे राष्ट्र देवतांचे’ ही गाणी स्पर्धकांनी सादर करून मराठीची महती सांगितली. मृण्मयी आरोलकर, गायत्री आरोलकर, सुशील प्रभुकेळुसकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन, तरउत्तेजनार्थ माधवी सोनवडेकर, तनुश्री काळसेकर यांनी क्रमांक पटकावला. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली. दोन्ही परीक्षकांचा ग्रंथभेट देऊन सन्मान करण्यात आला. श्रेया चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी प्रतिभा पेडणेकर, रमाकांत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT