कोकण

कोमसापला नवी मुंबईत सिडकोची जागा देण्यात येणार

CD

rat४p१८.jpg
८६८६२
मुंबईः कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत सदिच्छा भेट घेतली.
---------------
कोमसापला नवी मुंबईत सिडकोची जागा देण्यात येणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; मधु मंगेश कर्णिक, डॉ. प्रदीप ढवळ यांच्या शिष्टाईला यश
रत्नागिरी, ता. ४ः कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यालयीन कामकाजासाठी नवी मुंबईतील सिडकोच्या अखत्यारितील जागा देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कोमसापचे संस्थापक, सुप्रसिद्ध साहित्यिक मधु मंगेश कर्णिक व कोमसापचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन एक निवेदन दिले. त्या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिले.
मराठी भाषा व साहित्य यांची गेली ६५ वर्षे केलेल्या सेवेतून माझ्या निरीक्षणानुसार, मराठी भाषा व साहित्य यांच्या भल्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आपण मराठी भाषा मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी. यात मराठी भाषा विभागाचे कार्य, कर्नाटक सीमा भागासाठी ''महाराष्ट्र परिचय केंद्र'' सुरू करणे, ''पुस्तकांचे गाव'' या योजनेमध्ये मालगुंड येथील केशवसुत स्मारकाचा समावेश करणे, केशवसुत स्मारकाच्या मालगुंड या गावाला पर्यटनाचा दर्जा देणे, मुंबईत घसरता मराठी टक्का, मुंबई विद्यापीठात ''केशवसुत अध्यासन'' सुरू करणे, मराठी भाषा धोरण, मराठीसाठी प्राधिकरण, मराठी विद्यापीठाची स्थापना, प्रादेशिक साहित्य संस्थांना साहित्य संमेलनासाठी निधी आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा व्हावी.
मुख्यमंत्री शिंदे यांनी मधु मंगेश कर्णिक यांच्या या मुद्द्यांवर मराठी भाषा मंत्री व संबंधित अधिकारी यांची तत्काळ बैठक बोलवण्याचे आदेश दिले. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी कोमसापच्या कार्यालयीन कामकाजासाठी कोमसापला नवी मुंबई येथील सिडकोच्या अखत्यारितील जागा देण्याचेही आदेश दिले. कोमसापच्या अंतर्गत ''मराठीच्या भल्यासाठी व्यासपीठ'' या बॅनरखाली महाराष्ट्रातील २४ संस्थांनी एकत्र येत, मराठी भाषा, संस्कृती व साहित्य यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा हेतू बाळगला आहे. या संस्थांनी आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनाची दखल घेत मुंबईत ''मराठी भाषा भवना''च्या शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदनही मधु मंगेश कर्णिक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीच्यावेळी केले.
अनेक दिवस कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोमसापचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ विविध मागण्यांसाठी सरकार दरबारी प्रयत्नशील असताना, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी भेटीची वेळ देत कोमसापच्या विविध मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कोमसापने समाधान व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT