कोकण

महावितरण कर्मचाऱ्यांनी विनाअपघात सेवा द्यावी

CD

rat०४२७.txt

बातमी क्र. .२७ (पान ५ साठी)

फोटो ओळी
- ratchl४३.jpg ः
८६८६३
चिपळूण ः लाईनमन दिवस साजरा करण्यासाठी संघटित झालेल्या महावितरणचे अधिकारी व कर्मचारी.
---
महावितरण कर्मचाऱ्यांनी विनाअपघात सेवा द्यावी

कैलास लवेकर ; लाईनमन दिवसानिमित्त कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः महावितरणमध्ये कार्यरत असलेले लाईनमन हे नेहमीच कठीण परिस्थितीत काम करत असतात. लाईनमन यांनी विद्युत पुरवठा बंद असल्याची खात्री करूनच दुरुस्तीची कामे करावीत. सुरक्षासाधनांचा वापर करावा. सुरक्षासाधनांचा वापर टाळून विद्युत पुरवठा सुरू असतानाच तिथे काम केल्यास ते जिवावर बेतू शकते. येथे दुसरी संधी मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी विनाअपघात सुरक्षितपणे ग्राहकांना सेवा द्यावी, असे प्रतिपादन चिपळूण महावितरणचे कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांनी केले.
यावर्षी केंद्र व राज्य सरकारने ४ मार्च हा दिवस लाईनमन दिवस म्हणून साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येथील विभागीय महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांच्या अध्यक्षतेखाली लाईनमन दिवस साजरा करण्यात आला. या वेळी चिपळूण शहर व ग्रामीण उपविभागातील शाखाधिकारी, उपविभागीय अधिकारी व सर्व जनमित्र उपस्थित होते. या वेळी काम करताना घ्यावयाची सुरक्षा याबाबत जनमित्र चौगुले, कदम, सावर्डेकर, यंत्रचालक खेतले, उपव्यवस्थापक रमेश इंगळे, अशोक काजरोळकर यांनी उपस्थित जनमित्रांना मार्गदर्शन केले. उपस्थित जनमित्रांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या निमित्ताने उकृष्ट लाईनमन कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यकारी अभियंता पालशेतकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT