कोकण

सिंधुदुर्गची सागरी सुरक्षा अभेद्यच

CD

टीपः swt४३६.jpg मध्ये फोटो आहे.
आचरा ः ‘विजय एक’ अभियानात ताब्यात घेतलेल्या रेड टीमसह ब्लू टीमचे पथक.

सिंधुदुर्गची सागरी सुरक्षा अभेद्यच

‘विजय एक’ अभियान; आचरा,सागरी पोलिसांची चोख कामगिरी

आचरा, ता. ४ ः सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून घेण्यात येणाऱ्या सागर सुरक्षा कवच मोहिमेच्या धर्तीवर सिंधुदुर्ग किनारपट्टीवर काल (ता. ३) सकाळी सहापासून ‘विजय एक’ हे अभियान राबविण्यात आले. यात पोलिसांच्या सतर्क ब्लू टीमने रेड टीमला पकडून सागरी सुरक्षा अभेद्य असल्याचे सिद्ध केले. हे अभियान सायंकाळी सहाला संपले.
सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या आदेशाने ‘विजय १’, हे सागरी सुरक्षेचा आढावा घेणारे अभियान राबविण्यात आले. आचरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा बंदर, पिरावाडी, आचरा तिठा, जामडूल बेट, बेळणे चेकपोस्ट तसेच समुद्रात गस्तीनौकेच्या माध्यमातून १ पोलिस निरीक्षक, १ सहाय्यक पोलिस निरीक्षक, १० पोलिस हवालदार, १ पोलिस शिपाई, ८ होमगार्ड, असे मिळून २१, तर सागरी पोलिस अधिकारी, कर्मचारी, सागर सुरक्षा रक्षक सहभागी झाले होते. देवगडहून मालवणच्या दिशेने समुद्रातून दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एक नौका संशयास्पदरित्या जात असल्याचे समुद्रात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना दिसली. इशारा करून ती थांबली नसल्याने पोलिसांच्या स्पीडबोटने संशयास्पद नौकेला पकडले असता ती रेड टीम असल्याचे स्पष्ट झाले. त्या संशयास्पद नौकवरील संशयितांना आचरा-पिरावाडी समुद्र किनारी आणून त्यांची ओळख परेड केली असता ते वेगळ्या वेशातील पोलिस म्हणजेच रेड टीम असल्याचे स्पष्ट झाले. आचरा व सागरी पोलिसांसह सुरक्षा रक्षकांनी चोख कामगिरी बजावल्याने ब्ल्यू टीम रेड टीमवर भारी पडल्याचे दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळेंकडून दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

SCROLL FOR NEXT