कोकण

कचऱ्याचे दहन करून पिंगुळीत अनोखी होळी

CD

87348
पिंगुळी ः म्हापसेकर तिठा येथे व्यापारी बांधवांमार्फत कचरा दहन करून अनोखी होळी साजरी करण्यात आली.

कचऱ्याचे दहन करून
पिंगुळीत अनोखी होळी
कुडाळ ः पिंगुळी गावात ठिकठिकाणी होळी साजरी करत असताना पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथे व्यापारी बांधवांमार्फत कचरा गोळा करत त्याचे दहन करून अनोखी होळी साजरी करण्यात आली. यावेळी नारळ ठेवून गावात कचरा टाकणाऱ्या व्यक्तींना गावाच्या नुकसानीबाबत जाणीव करून दे आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता त्याची विल्हेवाट लावण्याची बुद्धी दे, अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळीं व्यापारी संघटना अध्यक्ष सुनील म्हापसेकर, उपाध्यक्ष दीपक गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष राघोबा धुरी, भूषण तेजम, सतीश माडये, साईराज जाधव, पंकज गावडे आदी उपस्थित होते.
..............
तरंदळेत आज महिलादिन
कुडाळ ः तरंदळे ग्रामपंचायत आयोजित महिला दिनानिमित्त उद्या (ता. ८) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आत. सकाळी पावणे नऊला कार्यक्रमाचे उद्‍घाटन, दहाला तरंदळे ग्रामपंचायत व लायन्स आय हॉस्पिटल यांच्यावतीने मोफत नेत्र चिकित्सा शिबिर, साडेदहाला जिल्हास्तरीय बालक्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये तरंदळे शाळा नंबर एकच्या लहान गटाने उपविजेतापद मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार, दुपारी दोनला महिलांसाठी व गावातील विधवांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला आहे. विधवा महिलांना सन्मान देण्यासाठी त्यांना या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. दुपारी अडीचला गावातील कर्तबगार महिलांचा सन्मान, साडेतीनला कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT