कोकण

देवगडच्या किनाऱ्यावर वातावरणामध्ये बदल

CD

देवगडच्या किनाऱ्यावर
वातावरणामध्ये बदल
देवगड, ता. ७ ः होळी उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्याच्या किनारी भागातील वातावरणात बदल जाणवत आहे. आज पहाटेपासून किनारी भागात जोराचा वारा सुटला होता. काल (ता. ६) सायंकाळपासून वातावरणात धुलीकण असल्याचे जाणवत होते. त्यातच रात्रीच्या सुमारास काही भागात पावसाचे थेंब टपकले.
गेले काही दिवस वातावरणात सातत्याने बदल जाणवत आहेत. दिवसा कडक ऊन तर पहाटेच्यावेळी थंडी, असे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच काल सायंकाळच्या सुमारास वातावरणात धुलीकण असल्याचे जाणवत होते. त्यामुळे धुळीचे वादळ उठल्यासारखे वातावरण भासत होते. रात्री आकाशात काळे ढग दाटून येऊन पावसाचे थेंब टपकले. आज पहाटेपासून दुपारपर्यंत किनारी भागात जोराचा वारा सुटला होता. वार्‍यामुळे धुळ वातावरणात मिसळत होती. वातावरणातील उकाडाही वाढला होता. त्यामुळे पाऊस कोसळण्याची लक्षणे मानली जात होती. जोराचा वारा सुटल्याने आंबा फळे जमिनदोस्त होण्याच्या भीतीने बागायतदारांमधील चिंता वाढली होती. वारा थांबल्यानंतर पुन्हा उकाडा जाणवू लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Gautam Gambhir मला देशद्रोही म्हटलं अन् अपशब्दही वापरले... ', विश्वविजेत्या भारतीय खेळाडूचा खळबजनक आरोप

Pune Water Issue : पुणे महापालिकेचे कडक पाऊल! व्यावसायिक कारणासाठी पिण्याचे पाणी वापरल्यास कारवाई

Pune Crime : भोंदूबाबा मिश्रासह महिला आरोपींचा असहकार; तपास अधिकाऱ्याची न्यायालयात माहिती

Indigenously Built Warship : भारतीय नौदलाच्या ताफ्यात तीन स्वदेशी युद्धनौकांची भर; उद्या कोलकात्यात समारंभ

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT