कोकण

चिपळूण ः महिलांच्या कौशल्य विकासातून आत्मनिर्भर भारत

CD

rat७p२९.jpg ःKOP२३L८७३९८

चिपळूण ः प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरणप्रसंगी उपस्थित मान्यवर.

महिलांच्या कौशल्य विकासातून आत्मनिर्भर भारत
उमा प्रभू ः चिपळुणात कौशल्य विकास मेळावा
चिपळूण, ता. ७ ः महिलांच्या कौशल्य विकासातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती होईल. कुशल महिलांच्या उपजीविका विकासासाठी जनशिक्षण संस्था कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मानवसाधन विकाससंस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू यांनी केले.
शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात मेळावा झाला. या वेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींना प्रभू यांनी संबोधित केले. जिल्हाभरातून साडेतीनशेहून अधिक प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. ‍यावेळी ४६ सेंटर्स, १९ संस्था, ५६ प्रशिक्षकांना व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
उमा प्रभू यांनी तळागाळातील लोकांसाठी मानवसाधन विकाससंस्थेच्या माध्यमातून गेली २० वर्षे त्या सिंधुदुर्ग व नवी मुंबई येथे कृतिशील आहेत. तसेच त्या ‘इफ्को टोकिओ’या कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत व कंपनीच्या सीएसआर अध्यक्षा आहेत. माजी आमदार डॉ. विनय नातू, आदिती सावंत, सीमा यादव, अ‍ॅड. हर्षद भडभडे, बबनराव पटवर्धन, महेश गर्दे, सोनाली खर्चे, विजय देसाई, गौरव पोंक्षे उपस्थित होते.
जनशिक्षण संस्थान रत्नागिरीचे पहिलं वर्ष आहे. जिल्ह्यातून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी प्रशिक्षक महिलांकडून जनशिक्षण संस्थान योजनेवरील पथनाट्याचे सादरीकरण तसेच प्रशिक्षणार्थींनीही विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

चौकट

१ हजार ६०० लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचली
‘जनशिक्षण संस्थान’ ही योजना भारत सरकारच्या कौशल्यविकास व उद्योजकता मंत्रालयातर्फे राबवण्यात येत आहे. २०२१-२२ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेचे काम सुरू झाले आहे. या योजना सुरेश प्रभू यांनी स्थापन केलेल्या मानवसाधन विकाससंस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात राबवली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे चेअरमन म्हणून माजी आमदार डॉ. विनय नातू काम पाहत आहेत. सहा महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतून ८० प्रशिक्षण सुरू करण्यात आली. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून १ हजार ६०० लाभार्थ्यांपर्यंत ही योजना यशस्वीपणे पोहोचली आहे तसेच या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT