पान १ साठी
८७४२४
मुंबईतून पळालेल्या तीन
अल्पवयीन मुली ताब्यात
खेड पोलिसांची कामगिरी; पालकांच्या भीतीने निघून आल्या
खेड, रत्नागिरी, ता. ७ ः काशिमिरा पोलिस ठाणे (मुंबई) हद्दीतून ३ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचा संदेश मिळाल्यानंतर संपूर्ण पोलिस यंत्रणा सतर्क झाली. याबाबत मीरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्तांकडून खेड पोलिसांना मिळलेल्या संदेशानंतर काही तासांत खेड पोलिसांनी या अपहरणाचा छडा लावला. घराशेजारी बागेमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या ३ अल्पवयीन मुलींना घरी जाण्याकरिता उशीर झाल्याने, आपले पालक आपल्याला आता ओरडतील, या भीतीपोटी मांडवीतून निघालेल्या तिघींना येथील पोलिसांनी खेड रेल्वे स्थानकातून आज ताब्यात घेतले. खेड रेल्वेस्थानकात मांडवी एक्स्प्रेस अधिक काळ थांबवून झडती घेतली असता एका बोगीत या तिन्ही मुली सापडल्या.
चौकशी केली तेव्हा वेगळाच प्रकार पुढे आला. घरी जाण्यास उशीर झाल्याने पालक ओरडणार, या भीतीने या मुली गेल्याचे पोलिस तपासात उघड झाले. तिन्ही मुलींना सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले. मीरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्तांकडून खेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांना आज सकाळी साडेअकरा वाजता संदेश मिळाला. काशिमिरा पोलिस ठाणे गुटन येथे कलम ३६३ अन्वये ३ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदवला होता. गुप्त माहितीनुसार, या अपहरणात मुलींचे लोकेशन मांडवी एक्स्प्रेस या धावत्या रेल्वेमध्ये असल्याबाबत माहिती मिळाली. खेड पोलिसांना त्यांचा शोध घेण्याबाबत विनंती केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खेडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांनी पथके तयार केली. आज १२ वाजून ५ मिनिटांनी खेड रेल्वेस्थानक येथे येणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसच्या तपासणीच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधला. ही रेल्वे जादा ५ मिनिटे खेड रेल्वेस्थानकात थांबवली.
होळीच्या निमित्ताने कोकणामध्ये येणाऱ्या नागरिकांची रेल्वेमध्ये मोठी गर्दी होती. याची पूर्ण कल्पना तसेच वेळेची मर्यादा असताना देखील या तीनही मुलींचा मांडवी एक्स्प्रेसमध्ये कसून शोध घेतला. अखेरीस या मुली रेल्वेच्या एका बोगीमध्ये सापडल्या. तिन्ही मुलींना खेड पोलिस ठाण्यात आणले आहे. मुलींकडे अधिक चौकशी केली करण्यात आली. तेव्हा मुली शेजारील गार्डनमध्ये फिरण्यासाठी गेल्या होत्या; मात्र त्यांना घरी जाण्यासाठी उशिर झाला. पालक ओरडतील, या भीतीने त्या निघून आल्या आणि रेल्वेमध्ये बसल्याचे पोलिस तपासात उघड झाले. या तिन्ही मुली सुखरूप असून, पोलिसांनी त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केल्या आहेत. ही कारवाई खेड पोलिस पथकाने केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.