कोकण

मासे विक्रीसाठी उभारलेल्या झोपडीला दोडामार्गात आग

CD

87529
दोडामार्ग ः मासे विक्रीसाठी निवारा म्हणून उभारलेली झोपडी आगीत जळून खाक झाली.

मासे विक्रीसाठी उभारलेल्या
झोपडीला दोडामार्गात आग

एका संशयिताला पोलिसांकडून अटक

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ७ ः मासे विक्री करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या झोपडीला आग लावून जाळल्याची तक्रार फिर्यादी दर्शना दशरथ जाधव यांनी संशयित संतोष बोडेकर यांच्याविरुद्ध दोडामार्ग पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली.
या प्रकरणी दोडामार्ग पोलिस ठाण्यात गवस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वझरे येथील दर्शना जाधव यांचा दोडामार्ग शहरात मासे विक्रीचा व्यवसाय आहे. मच्छी विक्रीसाठी बाजारपेठेत निवाऱ्यासाठी झोपडी उभारून त्यांनी आपला व्यवसाय थाटला आहे. आठवड्यातून सोमवार व गुरुवार या दोन दिवशी त्यांचे मासे विक्रीचे दुकान बंद असते. त्यानुसार काल (ता. ६) दुकान बंद होते. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानाला आग लागली. ही आग संतोष बोडेकर या युवकाने लावल्याचा त्यांचा संशय आहे. त्यांनी पतीसमवेत घटनास्थळी धाव घेतली. दुकानाकडे पोहोचेपर्यंत आतील सामान जळाले होते. यात त्यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत जाधव यांनी येथील पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बोडेकर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. आग लावण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, Test: भारताची चिंता वाढली! ७ ऑगस्टच्या सामन्याबाबत समोर आली महत्त्वाची अपडेट

Koyna Dam : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; पाण्याची आवक घटली, 92.49 टीएमसी साठा

Kia Sorento: फॉर्च्यूनरला टक्कर! कियाची पहिली हायब्रिड SUV 'Sorento' लाँचसाठी तयार; प्री-बुकिंग सुरू!

Marathi Live Updates News: राज ठाकरे यांनी घेतले डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

दीड वर्ष वेगळे राहतायत अमृता अन् हिमांशू; नात्याबद्दल विचारताच दोघांनीही बोलणं टाळलं; एवढंच म्हणाले की-

SCROLL FOR NEXT