कोकण

मुक्ताई ॲकॅडमीच्या खेळाडूंचे कॅरम, बुद्धिबळ स्पर्धेत यश

CD

८७८९६

मुक्ताई ॲकॅडमीच्या खेळाडूंचे
कॅरम, बुद्धिबळ स्पर्धेत यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः डेरवण-चिपळूण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टतर्फे १६ वर्षांखालील गटात घेण्यात आलेल्या कॅरम व बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकॅडमीच्या बारा विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आठ पारितोषिके मिळविली. कॅरम स्पर्धेत चार विदयार्थ्यांनी सहभाग घेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. स्पर्धेत ४० जणांनी सहभाग नोंदविला. बारा वर्षीय राष्ट्रीय खेळाडू साक्षी रामदूरकर हिने तिसऱ्या क्रमांकासह कांस्य पदक पटकावले.
बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेतलेल्या आठ विद्यार्थ्यांपैकी सात जणांनी पारितोषिके मिळविली. ॲकॅडमीची सर्वात लहान ७ वर्षीय विद्यार्थिनी निधी गवस हिने पहिल्यांदाच स्पर्धेत सहभाग घेऊन नऊ वर्षांखालील गटात दुसऱ्या क्रमांकासह रौप्य पदक प्राप्त केले. १० वर्षीय तन्मय शितोळे याने बारा वर्षांखालील गटात सुवर्ण पदक, भूमी कामत हिने मुलींच्या गटात तिसरा, ८ वर्षीय राष्ट्रीय खेळाडू यश सावंत याने अनरेटेड गटात प्रथम, रेटिंग प्लेअरच्या गटात राष्ट्रीय खेळाडू विभव राऊळ याने प्रथम, भावेश कुडतरकर याने द्वितीय, कुडाळ येथील अनुज व्हनमाने याने मुख्य गटात तेरावा क्रमांक मिळविला. विजेत्या खेळाडूंना पारितोषिके देऊन गौरविले. स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आदी ठिकाणच्या स्पर्धकांचा सहभाग होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुक्ताई ॲकॅडमीच्या विदयार्थ्यांचाच सहभाग होता. सातत्याने ५ वर्षे मुक्ताई ॲकॅडमीच्या विदयार्थ्यांनी स्पर्धेत वर्चस्व ठेवले. सर्व विदयार्थ्यांना ॲकॅडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर आणि बुद्धिबळ राष्ट्रीय प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT