

India vs Afghanistan 1st T20I
Sakal
Afghanistan Vs India 1st T20I, Playing XI: भारत आणि अफगाणिस्तान संघात टी२० मालिकेला रविवारपासून (१३ सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. या मालिकेतील सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे.
रविवारी होत असलेल्या पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान संघ पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरेल.