कोकण

कणकवलीतील चार्मिंग लेडी स्पर्धेत प्रियांका जाधव विजेत्‍या

CD

kan93.jpg
87933
कणकवली : येथील मिळून साऱ्याजणी परिवाराच्या महिला दिन कार्यक्रमाचे उद्‌घाटन करताना मधुरा पालव. दुसऱ्या छायाचित्रात चार्मिंग लेडी स्पर्धेतील विजेत्‍या प्रियांका जाधव आणि इतर स्पर्धक (छायाचित्र : विनोद दळवी, कणकवली)

प्रियांका जाधव यांना चार्मिंग लेडी मान
पाककला स्पर्धेत मीना सुतार प्रथम : मिळून साऱ्याजणीं मंचचा महिला दिन उत्‍साहात
कणकवली, ता. ९ : शहरातील मिळून साऱ्याजणी मंच परिवाराचा महिला दिन उत्‍साहात पार पडला. सर्व वयोगटातील महिलांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली. शहर आणि परिसरातील महिलांच्या गर्दीने मातोश्री मंगल कार्यालय खचाखच भरले होते. महिला दिनानिमित्त झालेल्‍या चार्मिंग लेडी स्पर्धेत प्रियांका जाधव विजेतेपदाचा मान पटकावला. तर पाककला स्पर्धेत मीना सुतार यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
महिला दिन कार्यक्रमाचे उद्‌घाटन मंचाच्या अध्यक्षा मधुरा पालव यांनी केले. यानंतर लगेचच पाककला स्पर्धा झाली. यात मीना रमाकांत सुतार यांनी प्रथम क्रमांक, मंजिरी वारे यांनी द्वितीय तर तृतीय क्रमांक विभागून शर्वरी जाधव देवरुखकर, सुमेधा ठाकूर देसाई आणि राधिका जावडेकर यांच्या पाककृतींना देण्यात आला. साठ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण निनाद पारकर यांनी केले.
मिळून साऱ्याजणी परिवाराच्या चार्मिंग लेडी स्पर्धेचे मानकरी कोण होणार याची उत्कंठा होती. यात सर्व पातळ्यांवर अग्रस्थानी राहत प्रियांका जाधव यांनी विजेतेपद पटकावले. तर नेहर गरूड उपविजेत्‍या ठरल्या. यास्पर्धेत बेस्ट कॅटवॉक लता पाटील, उत्कृष्ट पोशाख शमिका खंडवी आणि विशेष बुद्धिमानचे पारितोषिक अन्वी सरूडकर यांना देण्यात आले. या स्पर्धेत स्मिता बुटाले, अर्चना जोशी, संजना ठाकूर, मीनल मर्गज आदींनी सहभाग घेतला होता.
महिला दिनाच्या कार्यक्रमाला जिल्‍हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्‍हा बँक संचालक सुशांत नाईक उपस्थित होते. कार्यक्रमात धुरी ड्रायव्हींग स्कूलच्या संचालिका आरती धुरी यांना उद्योगिनी पुरस्कार देण्यात आला. तर युरेका सायन्स क्‍लबच्या सुषमा दयानंद केणी यांना विशेष व्यक्‍ती पुरस्कार देण्यात आला. उपक्रमशिल शिक्षिका प्रेरणा सावंत, नाट्यकर्मी सुहास वरूणकर, जोगळेकर आई आणि जय भवानी महिला बचतगट सदस्यांनाही विशेष कार्य कर्तृत्वाबद्दल गौरविण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्‍य, मिमिक्री, कविता वाचन, गायन यामध्ये पोयेकरवाडी ग्रुपच्या सोनाली नारकर, रोहिणी मालिये, सुचिता सोहनी, सरिता चव्हाण, संजना राणे, पुनम हजारे -पेडणेकर, सोनल सुतार, सोनल गुरव,तन्वी पारकर, अक्षता कोदे, शिल्पा पेडणेकर, अमिता सावंत, सायली विखाळे, रंजना विखाळे, टीव्ही कलाकार दीक्षा पुरळकर, नेहा पारकर पूनम म्हापसेकर, अविता धावरे, दिव्या साळगावकर, आर्या शिरसाट, शुभांगी उबाळे, दर्शना राणे, श्वेता घाणेकर, मेधावी धुमाळे, सम्राज्ञी धुमाळे, श्रद्धा कदम, प्रतिभा सावंत, रुचिरा वर्णे, सुखदा गांधी यांनी सहभाग घेतला. शहरातील बांधकरवाडीतील महिलांनीही विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात पूजा सदडेकर, विनिता सदडेकर, आरती मेस्त्री, अक्षता मेस्त्री, स्वाती गोखले, पायल मेस्त्री, अनुजा गोखले, दीपा सरूडकर, अंजली राणे यांचा सहभाग होता. शिवशक्तीनगर मधील पूजा शिंदे, श्रावणी कोकरे, शमिका खंडवी, गीता डावरे, पूजा कदम, नेहा कांबळी, सानिका कदम, सारा खंडवी, स्वरा कोकरे, सानिका गुरखे यांनी विविध धम्माल सादरीकरण केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी समृद्धी पारकर, शितल पारकर, सेजल पारकर, तेजल लिंग्रज, पूजा परब, सुमेधा काणेकर, भाग्यश्री रासम, संजना साटम, रिमा साटम , प्रीती म्हापसेकर, विना राणे, स्वाती परब, शितल सावंत, अमिता सावंत, शिल्पा सरूडकर, उज्वला काळसेकर, राधिका पालव, सुखदा गांधी, अल्फा पारकर, शुभांगी उबाळे दिव्या, साळगावकर, सुप्रिया मेघन सरंगले, मुन्नी बांदेकर, स्वरूपा विखाळे, वैदेही गुडेकर, संजना कोलते, सुप्रिया जाधव,नीता मयेकर, लल्लू पारकर, माधुरी कोदे, परी साळगावकर,रुपाली फाटक यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन अनुप्रिया खाडिये जोगळेकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT