कोकण

खारेपाटण शहरात पालख्यांने आगमन

CD

kan95.jpg
88008
खारेपाटण : शिमगोत्‍सवानिमित्त खारेपाटण शहरात लगतच्या गावांतील देवतांच्या पालख्यांचे आगमन झाले आहे. (छायाचित्र : रमेश जामसंडेकर)
----------------
खारेपाटण शहरात पालख्यांने आगमन
खारेपाटण, ता. ९ : खारेपाटण शहरात लगतच्या दशक्रोशीतील देवतांच्या पालख्यांने आगमन सुरू झाले आहे. शहर आणि बाजारपेठेत पालखी नाचविण्याचा सोहळा रंगत आहे. तसेच होळी निमित्तच्या विविध कार्यक्रमांनी शहर दुमदुमून गेले आहे.
खारेपाटण शहरातील श्रीदेव काळभैरव हा ७२ खेड्यांचा अधीपती मानला जातो. या देवाच्या भेटीसाठी खारेपाटण परिसर तसेच राजापूर तालुक्‍यातील अनेक देवतांच्या पालख्या शिमगोत्‍सवात दाखल होतात. यात होळी पौर्णिमेपासून आतापर्यंत राजापूर तालुक्‍यातील गुंजवणे महाकाली, श्रीदेव गांगेश्‍वर, पन्हाळे निनादेवी तसेच कुरंगवणे येथील विठू महाकाली या ग्रामदेवतांच्या पालख्या शहरात दाखल झाल्‍या आहेत. श्रीदेव काळभैरवची भेट घेतल्‍यानंतर देव चव्हाटा येथील मांडावर भेटीचा कार्यक्रम रंगला. तसेच होळीच्या खांबाभोवती पालख्या नाचविण्याचाही कार्यक्रम रंगला होता.
शिमगोत्‍सवासाठी खारेपाटण दशक्रोशीमध्ये मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी दाखल झाल्‍याने बाजारपेठेतील वर्दळ वाढली आहे. तर पुढील काही दिवसांत आखणी पालख्या दाखल होणार असल्‍याने खारेपाटण शहरात उत्‍साहाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई!५६ लाखांचा अन्नसाठी जप्त

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT