कोकण

खेड-भरणेमधील नवा जगबुडी जोडपूल वाहतुकीस खुला

CD

rat१०p२४.jpg
L८८२१९
खेडः महामार्गावरील जगबुडी नदीवर बांधलेला नवा पूल.
----------
भरणेमधील नवा जगबुडी
जोडपूल वाहतुकीस खुला
५ वर्षापासून सुरू होते काम ; ५ कोटी ८ लाखांचा निधी
खेड, ता. १० : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील नव्या जगबुडी पुलानजीक बांधण्यात आलेल्या जोडपुलाचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून या जोडपुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. भरणे येथील नव्या जगबुडी पुलानजीक गेल्या ५ वर्षापासून जोडपुलाचे काम सुरू होते. यासाठी ५ कोटी ८ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.
सुरवातीला या जोडपुलाचे काम रखडले होते. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर ठेकाधारक कल्याण टोलवेज कंपनीने पुलाचे काम पुन्हा सुरू करण्याची तयारी दर्शवली. सुरवातीपासूनच पुलाचे काम संथगतीनेच सुरू होते. त्यात कोरोना संकटाची भर पडल्याने पुलाचे काम रेंगाळले होते. मात्र जानेवारी महिन्यापासून जोडपुलाच्या कामाने वेग घेतला. यामुळे गतमहिन्यात जोडपुलाचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर हा पूल मार्चमध्ये वाहतुकीस खुला होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानुसार ठेकाधारक कंपनीने जोड पुलाची उर्वरित कामे पूर्ण केल्याने गेल्या काही दिवसांपासून हा पूल वाहतुकीसाठी खुलाही करण्यात आला. सद्यस्थितीत या जोडपुलावरून वाहने धावत असून प्रवासही सुसह्य झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT