कोकण

व्यापाऱ्यांना शासकीय योजनांचे मार्गदर्शन

CD

88333
मालवण ः प्रमोद ओरसकर, उमेश नेरुरकर यांचा जिल्हा व्यापारी संघातर्फे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, अरविंद नेवाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शासकीय योजनांचे व्यापाऱ्यांना धडे

मालवणात स्नेहमेळा उत्साहात; पुढील वर्षीच्या मेळाव्याचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १० : तालुका व्यापारी संघाचा स्नेहमेळावा चिवला बीच-धुरीवाडा कुरण येथे नुकताच झाला. यानिमित्त विविध कार्यक्रमांसह विविध शासकीय योजनांबाबत उपस्थित व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पुढील वर्षी होणारा व्यापारी मेळावा भव्य स्वरुपात करण्याचे ठरवून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा व्यापारी संघांचे अध्यक्ष प्रसाद पारकर, मालवण तालुका व्यापारी संघांचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर, मालवण शहर व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, माजी जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, नितीन वाळके, अरविंद नेवाळकर, अशोक सावंत, दीपक भोगले, विजय केनवडेकर, गणेश प्रभुलकर, नाना पारकर, राजन नाईक, द्वारकानाथ घुर्ये, मुकेश बावकर आदी उपस्थित होते.
मालवण व्यापारी संघाला यावर्षी ५० वर्षे, तर मालवण तालुका व्यापारी संघाला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. जिल्हा व्यापारी महासंघाचा ३६ वा जिल्हा व्यापारी मेळावा पुढील वर्षी ३१ जानेवारीला मालवणात होणार आहे. हा तिरंगी योग साधून जिल्हा व्यापारी मेळाव्याचे पाच दिवसीय भव्य व्यापारी प्रदर्शन मालवणात आयोजित करण्याचे तालुका व्यापारी संघाच्या स्नेहसंमेलनात ठरविण्यात आले. या प्रदर्शनात व्यापार, पर्यटन, मत्स्य व्यवसाय व कृषी व्यवसाय या व्यापारी घटकांचा समावेश असणार आहे. यानिमित्त व्यापाऱ्यांची सागर ते सह्याद्री अशी २०० किलोमीटर अंतराची लाखो रुपये पारितोषिकांची भव्य दुचाकी रॅली काढण्यात येईल, असे ठरविण्यात आले.
मालवणात होणाऱ्या व्यापारी प्रदर्शनासाठी केंद्राच्या सूक्ष्म, लघु, माध्यम उद्योग खाते, पर्यटन खाते, एमटीडीसी यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. प्रदर्शनासाठी शासकीय मदतही घेतली जाणार आहे. या प्रदर्शनात व्यापार उद्योगातील बदलते ज्ञान, यंत्रसामग्री याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. इतर वेळी आयोजित होणारी कृषी व उद्योग प्रदर्शने यांना व्यापाऱ्यांना आपल्या कामातील व्यस्ततेमुळे जाता येत नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांना प्रदर्शनाचा लाभ घेत यावा, यासाठी या प्रदर्शनाची आयोजन केल्याची माहिती वाळके यांनी दिली.
यानिमित्त मालवणच्या वेशीवर भव्य स्वागत कमान उभारण्यात येणार आहे. व्यापारी संघाच्या सभासदांना ओळखीसाठी लोगो देण्यात येणार आहेत. आपत्तीमुळे नुकसान होणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी आपत्ती निवारण कोष निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा व्यापारी पतसंस्थेत व्यापाऱ्यांच्या पाच वर्षासाठी ठेवी ठेवण्यात येणार असून त्यातून मिळणाऱ्या व्याजातून आपद्ग्रस्त व्यापाऱ्यांना निधी देण्यात येणार आहे. तो त्यांनी बिनव्याजी परत करावयाचा आहे. मालवण व्यापारी संघाच्या युवा, महिला व पर्यटन समित्या गठीत करण्यात येणार आहेत. मालवण व्यापारी संघांचे कार्यालय १ एप्रिलपासून मामा वरेरकर नाट्यगृह शेजारील इमारतीत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वाळके यांनी दिली. १६ एप्रिल रोजी सागर ते सह्याद्री अशी २०० किलोमीटर अंतराची भव्य दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली निवती येथून सुरू होऊन शिरशिंगे, आंबोली अशा मार्गे कुडाळ येथे संपणार आहे. या स्नेहसंमेलनात मालवण तालुका व शहर व्यापारी संघाची धुरा गेली अनेक वर्षे सक्षमपणे सांभाळल्याबद्दल प्रमोद ओरसकर व उमेश नेरुरकर यांचा जिल्हा व्यापारी संघातर्फे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, अरविंद नेवाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उमेश नेरुरकर यांनी स्वागत केले. गणेश प्रभुलकर यांनी आभार मानले.
---
नेवाळकर निवडणूक अधिकारी
मालवण व्यापारी संघाची पंचवार्षिक निवडणूक ६ ते २३ मार्च या कालावधीत होणार असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरविंद नेवाळकर यांची निवड झाली. जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांनी पुढील वर्षी मालवणात होणारा जिल्हा व्यापारी मेळावा हा भव्य होईल, असा विश्वास व्यक्त केला. विजय केनवडेकर यांनी सूक्ष्म, लघु व माध्यम उद्योग मंत्रालयाच्या योजनांबाबत माहिती दिली. मुकेश बावकर यांनी सेवा कराबाबत मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi: दिवाळीपूर्वी पीएम किसानचे २,००० रुपये मिळणार शेतकऱ्यांना मिळणार का? २४व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

Shark Tank USA: भारतीय तरुणाचा अमेरिकेत डंका! फक्त 2 चमच्यांच्या आयडियासाठी मिळाली ₹3.3 कोटींची ऑफर

Asian Para Games : नाशिकच्या Dilip Gavitची 'सुवर्ण' धाव! सिमरनने स्पर्धा विक्रमासह जिंकले गोल्ड; भारताचे पदकांचे अर्धशतक...

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक, मतदानासाठी कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत

SA vs AUS 2nd Test : दक्षिण आफ्रिकेने 'फास' आवळला! रबाडाच्या 154.5 kph वेगाच्या चेंडूने हेड हडबडला... यान्सेनने करेक्ट कार्यक्रम केला

SCROLL FOR NEXT