कोकण

शासकीय योजनांचा लाभ घ्या

CD

88334
वेंगुर्ले ः बचतगट स्नेहमेळाव्याचे उद्‍घाटन करताना प्रज्ञा परब. शेजारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत, प्रा. धनश्री पाटील, संगीता कुबल आदी.

शासकीय योजनांचा लाभ घ्या

प्रज्ञा परब; वेंगुर्लेत स्वयंसहाय्यता महिला बचतगट स्नेहमेळा


वेंगुर्ले, ता. ११ ः येथील पालिका राबवित असलेल्या शासनाच्या योजनांच्या अनुषंगाने महिला बचतगटांनी विविध व्यवसाय करावेत. महिलांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेऊन सक्षम बनावे, असे प्रतिपादन महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब यांनी पालिकेमार्फत आयोजित महिला स्वयंसहाय्यता बचतगटांच्या स्नेहमेळाव्यात केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील पालिकेच्या कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुद्देशीय सभागृहात आयोजित महिला स्वयंसहाय्यता बचतगटांच्या स्नेहमेळावाचे उद्‍घाटन संचालिका प्रज्ञा परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या प्रसंगी व्यासपीठावर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रा. धनश्री पाटील, पालिका प्रशासकिय अधिकारी संगीता कुबल आदी उपस्थित होते.
डॉ.माईणकर यांनी महिलांना आरोग्यविषयक शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांची माहिती देत महिलांनी वेळेत आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले. प्रमुख पाहुण्या प्रज्ञा परब, प्रा. धनश्री पाटील यांनी उदयोगांतील संधी आणि साध्य याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सानिया आंगचेकर, संस्कृती गावडे, स्नेहा नार्वेकर, पूजा धुरी, नीरजा मडकर, फाल्गुनी नार्वेकर यांचा सत्कार झाला. प्रा. धनश्री पाटील यांना पालिकेमार्फत ‘पर्यावरण दूत’ म्हणून सन्मानित केले. पालिकेच्या माध्यमातून आयोजित ‘कचऱ्यातून कल्पकता’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते झाला. भटवाडी पूर्ण प्राथमिक शाळा नं. २ च्या मुलांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ विषयावर पथनाट्य सादर केले. बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदीवर पथनाट्य सादर केले. पालिकेने बचतगटांच्या महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांची कला सादर करण्यासाठी एक मंच दिल्याने महिलांनी बचतगटांमार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून त्याचा आनंद घेतला. याबाबत पालिका प्रशासनाचे आभार मानण्यात आले. महिला स्वयंसहाय्यता बचतगटामार्फत प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, विलास ठुंबरे, अतुल अडसूळ व मनाली परब यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता कुबल, शिवानी ताम्हणेकर यांनी केले. पालिका मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena: शिवसेनेत मोठे बदल होणार! 'काम करा नाहीतर पद सोडा...'; पदाधिकाऱ्यांना कडक इशारा, पडद्यामागे काय घडतंय?

Mumbai News: मुंबईकरांसाठी गूडन्यूज! १२ डब्यांच्या २३८ नव्या लोकल खरेदी करणार; १९ हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

Gokul dairy election news : गोकुळ दूध संघाची निवडणूक लांबणीवर, १२०० दूध संस्थांच्या निर्णयानंतरच निवडणुका; कोर्टाने दिले थेट आदेश

लक्ष्मीकांत बेर्डेंचं गाजलेलं नाटक 'शांतेचं कार्टं चालू आहे' पुन्हा रंगभूमीवर ! प्रियदर्शन-विशाखाची रंगणार जुगलबंदी

Agniveer MR Musician Recruitment 2026 : आता संगीतकार बनू शकतात अग्निवीर! भारतीय नौदलात भरती होण्याची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT