कोकण

आयुर्वेद महाविद्यालयामध्ये महिलादिन विविध कार्यक्रमांनी

CD

88385
सावंतवाडी : महिला दिन कार्यक्रमात बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके. शेजारी डॉ. सई लळीत.

आयुर्वेद महाविद्यालयामध्ये
महिला दिन विविध कार्यक्रमांनी
सावंतवाडी ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय येथे प्लेक्सस विद्यार्थी संघ २०२३ मार्फत महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. पाटील होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सावंतवाडी पोलिस उपअधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके, प्रसिद्ध कवयित्री लेखिका डॉ. सई लळीत उपस्थित होत्या. डॉ. सोळंके यांनी महिलांच्या विविध समस्या, महिला अत्याचार, महिला सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. लळीत यांनी त्यांच्या स्वरचित मालवणी कविता सादर केल्या. एक वैद्यकीय व्यावसायिक म्हणून कार्य करत असताना समाजातील महिलांच्या विविध आरोग्याविषयी, समस्यांविषयी माहिती दिली. जिल्ह्यातील महिलांच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असून ही चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी आधोरेखित केले. प्रास्ताविक विद्यार्थी संघप्रमुख डॉ. सीतावार यांनी केले. निखिल दारिस्तेकर, स्वाती गाडवे, साक्षी देशपांडे, काजल ढाळे, कौसर, मेमन, सकिना खान, जयराज मरकड, शुभांगी घुटे, शिवानी सिंह, आकांक्षा फुके, आदित्य कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्राचार्य डॉ. दळवी, प्रा. डॉ. कठाणे, प्रा. डॉ. ठाकरे, प्रा. डॉ. ठाकरे, प्रा. डॉ. विठ्ठलानी, प्रा. डॉ. गोळघाटे, प्रा. डॉ. सौ. पाटील प्रा. डॉ. राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : संभाजीनगरमध्ये सिलिंडर स्फोट, बालिका ठार, पाच जखमी

SCROLL FOR NEXT