कोकण

चिपळूण ः बॅडमिंटनमध्ये कोकणसह मुंबई-ठाणेची बाजी

CD

(टीप- सिंधुदुर्गसह मुंबई, ठाणे आवृत्तीलाही द्यावी.)


-rat११p२५.jpg
88389
चिपळूण ः सिंधुदुर्गच्या सुफिया शेख हिने बॅडमिंटनमध्ये अतिशय चमकदार कामगिरी करत दोन सुवर्णपदके मिळवली.


बॅडमिंटनमध्ये कोकणसह
मुंबई-ठाण्याची बाजी

डेरवणमध्ये क्रीडा महोत्सव; सिंधुदुर्गच्या सुफिया शेखला दोन सुवर्णपदके

चिपळूण, ता. ११ ः शिवजयंतीनिमित्त ‘एसव्हीजेसीटी’तर्फे आयोजित क्रीडा महोत्सवात बॅडमिंटन क्रीडाप्रकारांत विविध वयोगटांतील अंतिम सामने चुरशीचे झाले. सहा बॅडमिंटनपटूंनी दोन गटांत खेळून उत्कृष्ट खेळ करत प्रत्येकी दोन पदके जिंकली. सिंधुदुर्गच्या सुफिया शेख या बॅडमिंटनपटूने १५ वर्षांखालील मुली आणि १७ वर्षांखालील मुलींच्या गटात खेळताना सुवर्णपदक पटकावले. मुंबईच्या अन्विषा घोरपडेने ११ वर्षांखालील आणि १३ वर्षांखालील मुलींच्या गटात रौप्यपदक पटकावले. ठाण्याच्या प्रीशा शहाने १५ वर्षांखालील मुलींच्या गटात रौप्य तर १७ वर्षांखालील गटात कास्यपदक पटकावले.
रायगडच्या आर्या जाधवने १५ वर्षांखालील मुलींच्या गटात कास्य, १७ वर्षांखालील गटात रौप्यपदक मिळवले. नाशिकच्या जागृती जाधवने ११ आणि १३ वर्षांखालील मुलींच्या गटात कास्य, तर पुण्याच्या सलिल मणेरीने १५ वर्षांखालील मुले या गटात सुवर्ण, तर १७ वर्षांखालील मुले या गटात रौप्यपदक पटकावले. बॅडमिंटन या क्रीडाप्रकारामध्ये ४१ मुली आणि ८७ मुले अशा एकूण १२८ बॅडमिंटनपटूंनी भाग घेतला होता. तीन दिवस चाललेल्या बॅडमिंटनच्या एकूण २०२ सामन्यांत अनेक तरुण खेळाडूंनी चमकदार खेळ करत लक्ष वेधून घेतले. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट आणि छत्रपती पुरस्कार विजेत्या मधुरा तांबे, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे वरिष्ठ अधिकारी अनंत चितळे यांच्या विजेत्या बॅडमिंटनपटूंना पारितोषिक वितरण करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल अनुक्रमे (सुवर्ण, रौप्य आणि कास्य) असा ः ११ वर्षाखालील मुली- श्रद्धा इंगळे (सातारा), अन्विषा घोरपडे (मुंबई), जागृती जाधव (नाशिक). ११ वर्षांखालील मुले- श्लोक गोयल (ठाणे), ईशान घेराडे (सांगली), रोनित जाधव (ठाणे), १३ वर्षांखालील मुली- मधुरा काकडे (पुणे), अन्विषा घोरपडे (मुंबई), जागृती जाधव (नाशिक). १३ वर्षांखालील मुले- सोहन तांबे (रायगड), अर्जुन जाधव (सातारा), शार्विल शिंदे (सांगली). १५ वर्षांखालील मुली- सुफिया शेख (सिंधुदुर्ग), प्रीशा शहा (ठाणे), आर्या जाधव (रायगड). १५ वर्षांखालील मुले- सलील मणेरी (पुणे), मोहित कांबळे (सिंधुदुर्ग), आर्यन जाधव (रायगड). १७ वर्षांखालील मुली- सुफिया शेख (सिंधुदुर्ग), आर्या जाधव (रायगड), प्रीशा शहा. १७ वर्षांखालील मुले- गिरीश शितोळे (सातारा), सलील मणेरी (पुणे), नेमी बोटदरा (ठाणे).
--------
चौकट
जाधव भावंडांची पदकांची कमाई
बॅडमिंटन स्पर्धेत आर्यन जाधव आणि आर्या जाधव ही भावंडे विशेष चमकली. त्यांचा खेळ लक्षवेधी ठरला. रायगडच्या आर्या जाधवने १५ वर्षांखालील मुलींच्या गटात कांस्य आणि १७ वर्षांखालील गटात रौप्यपदक मिळवले. १५ वर्षांखालील मुलांच्या गटात आर्यन जाधव कांस्यपदक पटकावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT