कोकण

कुडाळ आगारप्रमुख पदासाठी युवासेनेचा आंदोलनाचा इशारा

CD

swt1326.jpg
88846
योगेश धुरी

कुडाळ आगारप्रमुख पदासाठी
युवासेनेचा आंदोलनाचा इशारा
माणगाव, ता. १३ः येत्या आठ दिवसांत कुडाळ आगारप्रमुख नेमा; अन्यथा युवासेना स्टाईलने आंदोलन करू, असे इशारा युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी दिला आहे. कुडाळ आगारप्रमुख हे पद गेले कित्येक दिवस रिक्त आहे. या संदर्भात निवेदन दिले; मात्र अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच प्रवाशांची गैरसोय होत आहे. आगारात गाड्या बंद राहण्याचे प्रमाण जास्त आहे. बस कमतरतेमुळे एसटी वेळेत न सुटणे, मुलांच्या पासासंदर्भात अडचणी येत आहेत. आगारप्रमुखच नाही तर हे प्रश्न मांडायचे कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित होतो. येथील आगारामध्ये दोन वाहतूक निरीक्षक दिले आहेत; मात्र त्यांची काहीही गरज नाही. आगारप्रमुखासह एक वाहतूक निरीक्षक चालला असता. एसटी विभागाने येत्या आठ दिवसांत आगारप्रमुख नेमावा; अन्यथा युवासेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असे धुरी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. यावेळी तालुका समन्वयक योगेश तावडे, चिटणीस तानाजी पालव, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, शहर समन्वयक अमित राणे आदी उपस्थित होते.
....................
swt1327.jpg
88847
कुडाळः युवक काँग्रेसतर्फे नगराध्यक्ष आफ्रिन करोल यांचे अभिनंदन करण्यात आले.

कुडाळ नगराध्यक्षांना काँग्रेसतर्फे शुभेच्छा
मालवण : कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षा आफ्रिन करोल यांच्या वर्षपूर्तीबद्दल तसेच कुडाळ शहरातील नियोजनासाठी घेतलेल्या उत्तम निर्णयासाठी कुडाळ-मालवणमधील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांच्या उपस्थितीत त्यांचे कुडाळ येथे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी कुडाळ नगरपंचायत हद्दीत झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्त्या, सांडपाणी-कचरा नियोजन, गार्डन व्यवस्था, मार्केट विस्तार याबाबत सविस्तर चर्चा केली. भविष्यात होऊ घातलेल्या मालवण पालिका निवडणुकीमध्ये देखील उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन मार्गदर्शन करू, असे नगराध्यक्ष करोल यांनी यावेळी सांगितले. जिल्हा युवक काँग्रेस माजी अध्यक्ष देवानंद लुडबे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाडगावकर, विधानसभा उपाध्यक्षा पल्लवी खानोलकर उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Phaltan News: पाइपमध्‍ये अडकून तिघांचा मृत्‍यू; फलटण तालुक्यातील पाेटपाटातील घटना, तिघेही ओरिसातील पाेल्‍ट्री कामगार, काय घडलं!

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

SCROLL FOR NEXT