कोकण

सत्‍यशोधक संघटनेचा संपाला पाठिंबा

CD

८९०६९

सत्‍यशोधक संघटनेचा संपाला पाठिंबा

निवासी उपजिल्‍हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

कणकवली, ता. १४ : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाला सत्‍यशोधक शिक्षक सभेच्या सिंधुदुर्गतर्फे आज पाठिंबा जाहीर केला. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्‍हाधिकारी आविशकुमार सोनाने यांना दिले.
श्री. सोनाने यांना दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की, २००५ नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्‍या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य खडतर जाणार आहे. त्‍यामुळे या कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू व्हायला हवी. जुनी पेन्शन लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीपीएफची सुविधा आहे. यात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कुठल्‍याही प्रकारची कपात केली जात नाही. निवृत्तीनंतर ग्रॅच्युईटी मिळते. सेवा काळात मृत्‍यू झाल्‍यास वारस कुटुंबाला निवृत्तिवेतन मिळते. महागाई भत्त्यानुसार व वेतन आयोगानुसार पेन्शन वाढत जाते. या उलट २००५ नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्‍या कर्मचाऱ्यांना जीपीएफ सुविधा नाही. वेतनातून १० टक्‍के रक्‍कम कपात केली जाते. ग्रॅच्युईटची सुविधा नाही. कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू नाही. महागाई भत्त्यानुसार पेन्शन रक्‍कम वाढत नाही. या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व सरकारी कर्मचारी संपावर गेले असून त्‍याला सत्यशोधक संघटनेचा पाठिंबा असल्‍याचे निवेदन निवासी उपजिल्‍हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेश पेडणेकर, सचिव शंकर जाधव यांच्यासह जितेंद्र पेडणेकर, राम माने, गौतम तांबे, सुलभा तांबे, अमोल कांबळे, योगेश सपकाळ, संतोष पेडणेकर, स्वाती जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT