कोकण

सिंधुदुर्ग कुपोषणमुक्त करणार

CD

89114
सिंधुदुर्गनगरी ः अंगणवाडी सेविका आदर्श कर्मचारी पुरस्कार प्रदान करताना प्रशासक प्रजित नायर. शेजारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर आदी.


सिंधुदुर्ग कुपोषणमुक्त करणार

सीईओ प्रजित नायर; प्रोटीनयुक्त आहाराचा अभाव

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १४ ः जिल्ह्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. हे प्रमाण शून्य टक्के करण्याचा उद्देश आहे. यामागे प्रोटीनयुक्त आहाराचा अभाव हे कारण आहे. त्याचा परिणाम नवजात मुलांवर होतो. परिणामी जिल्ह्यात ‘सॅम’मधील कमी कुपोषित बालके आढळून येत आहेत. त्यामुळे आपल्याला जिल्हा ‘सॅम’मुक्त करावयाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले.
जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागातर्फे नवीन जिल्हा नियोजन सभागृहात आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई, सहाय्यक मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास आरोंदेकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे श्रीपाद पाटील, कणकवली प्रकल्प अधिकारी अमोल पाटील आदी उपस्थित होते.
श्री. नायर पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यामध्ये बालकांचे आरोग्य चांगले असून कुपोषणाचे प्रमाण कमी आहे. तरीही जिल्ह्यात कमी वजनाचे अथवा कुपोषित बालक जन्माला येऊ नये, यासाठी गर्भवती मातांच्या आहारावर लक्ष देणे आवश्यक आहे. गर्भवती व स्तनदा मातांना पावसाळ्यात प्रथिन युक्त आहार पुरेशा प्रमाणात मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणांनी भर द्यावा. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी चांगले काम केले असल्यामुळे जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कमी आहे.’’
महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी भोसले यांनी प्रास्ताविक केले. आरोग्य सेविका व मदतनीस आरोग्य व समाज शिक्षणाच्या माध्यमातून सदृढ व सशक्त समाज घडविण्याचे काम करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे. त्याचबरोबर महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रचार, प्रसार व प्रसिद्धी व्हावी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राहावा, यासाठी सिंधुसंवाद प्रणाली विकसित केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर यांनी महिला व बालविकास अधिकारी रसाळ, पर्यवेक्षिका उल्का हजारे यांनी मनोगते व्यक्त केली. प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ‘सिंधुकन्या’ व ‘सिंधुसंवाद’ या प्रणालीचे अनावरण केले. पोषण पंधरवड्याचा प्रारंभही झाला. ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेंर्गत काव्या भोगले हिच्या आई-वडिलांना बचत प्रमाणपत्र वितरण केले. तालुका महिला बाल कल्याण अधिकारी अमोल पाटील यांनी आभार मानले.
.................
चौकट
यांचा झाला सन्मान
एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत अंगणवाडीस्तरावर उत्कष्ट काम केलेल्या पर्यवेक्षिका उल्का हजारे, शैलजा मातोंडकर, अंगणवाडी सेविका संजना देवळेकर, शशिकला हळदकर, अपर्णा देसाई, आराध्या वाळवे, मिताली देसाई, गौरी देऊलकर, दीपिका बांदेकर, संयोगिता वाडकर, मिनी अंगणवाडी सेविका प्रणाली कदम, संगीता कदम, स्मिता बोभाटे, नंदिनी सावंत, मनीषा वेंगुर्लेकर, शीतल परब, अश्विनी राणे, ललिता गवस, अंगणवाडी मदतनीस रक्षिता गावकर, कांचन रावराणे, विशाखा देसाई, वैशाली लाड, समृध्दी मेस्त्री, स्वप्नाली पालकर, सुप्रिया वारंग, अश्विनी ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT