कोकण

कर्णेश्वर मंदिरातील शिवपिंडीवर झाला सोनेरी किरणांचा अभिषेक !

CD

rat१५p१५.jpg
८९२०४
संगमेश्वरः कर्णेश्वर मंदिरातील शिवपिंडीवर सोनेरी किरणे.

कर्णेश्वरातील शिवपिंडीवर
सोनेरी किरणांनी स्नान
संगमेश्वर, ता. १४ ः संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील कर्णेश्वर मंदिरात बुधवारी (ता. १५) सकाळी सातच्या सुमारास श्री कर्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवपिंडील सूर्यकिरणांनी शंभू महादेवांना सोनेरी सचैल किरणांचे स्नान घातले. वातावरणात पसरलेला भक्तिभाव आणि मंदिराच्या गाभाऱ्यात सर्वत्र पसरलेला सोनेरी प्रकाश असा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भक्तगणांनी गर्दी केली होती. आज सहा वाजून ४७ मिनीटांनी सूर्योदय झाला आणि पुढील दहा-बारा मिनिटातच किरणोत्सवाचा सोहळा पाहायला मिळाला.
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सूर्य मावळतीला गेल्यानंतर किरणोत्सव होतो. कसबा येथील श्री कर्णेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असल्याने येथे सकाळच्या प्रसन्नवेळी किरणोत्सवाचा अद्भुत सोहळा पाहायला मिळतो. खगोलशास्त्र, स्थापत्यशास्त्र आणि धार्मिकता यांचा त्रिवेणी संगम प्रत्यक्ष अनुभव घेण्याजोगाच सोहळा असल्याचे मत या वेळी भाविकांनी व्यक्त केले. सुमारे १० ते १२ मिनिटे भक्तगणांना आज हा सोहळा अनुभवता आला. अकराव्या शतकातील शिल्प समृद्ध मंदिर अशी कर्णेश्वर मंदिराची ओळख आहे. राज्यासह देश-विदेशातील शिल्प अभ्यासक या मंदिराला भेट देत असतात. या मंदिरात किरणोत्सव संपन्न होत असल्याने आता दरवर्षी हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविक उपस्थित राहतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT