कोकण

आगीच्या घटनास्थळाला आमदार साळवींची भेट

CD

rat१५३३.txt


rat१५p३०.jpg ः
८९२९०
राजापूर ः आपघातग्रस्तांशी संवाद साधताना आमदार राजन साळवी.


आगीच्या घटनास्थळी आमदार साळवींची भेट

राजापूर, ता. १६ः मुंबई मालाड येथील झोपडपट्टीमधील भीषण आगीच्या घटनास्थळाला आमदार राजन साळवी यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या आगीमध्ये मालाड येथे राहणाऱ्‍या राजापूर मतदार संघातील अनेक आपद्ग्रस्तांचा समावेश असून त्यांच्याशीही आमदार साळवी यांनी संवाद साधत धीर दिला. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, तहसीलदार विनोद धोत्रे यांच्याशी संवाद साधत आपद्ग्रस्तांना मदत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना दिल्या.
या वेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे राजापूर तालुका संपर्कप्रमुख अनिल भोवड, आप्पा पाडाचे उपविभागप्रमुख प्रदीप निकम, राजापूर तालुका युवाधिकारी संदेश मिठारी, प्रवीण शेट्ये, सहकारचे सुधीर मोरे, विद्यार्थीसेनेचे सुशांत पांचाळ, रघुनाथ पांचाळ आदी उपस्थित होते.
मुंबई मालाड आप्पापाडा येथील झोपडपट्टीमध्ये नुकतीच आग लागल्याची घटना घडली होती. या आगीमध्ये सुमारे साडेतीन हजाराहून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या तर या झोपड्यांमध्ये राहणारी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्यामध्ये राजापूर मतदार संघातील मात्र, सद्यःस्थितीमध्ये मालाड येथे राहत असलेल्या अनेक कुटुंबांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली त्या ठिकाणाला आमदार साळवी यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT