कोकण

कणकवली : गाबीत महोत्‍सव माहिती

CD

८९५०९


गाबीत महोत्‍सवाला दीड लाखांची उपस्थिती
परशुराम उपरकर : २४ मार्चला धुरीवाडा येथील बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन
कणकवली, ता.१६ : मालवण येथील दांडी किनाऱ्यावर २७ ते ३० एप्रिल या दरम्‍यान गाबीत महोत्‍सव होत आहे. या महोत्‍सवाला राज्‍य आणि राज्‍याबाहेरील गाबीत बांधव आणि पर्यटक असे दीड लाख जणांची उपस्थिती असेल अशी माहिती अखिल भारतीय गाबीत महासंघ अध्यक्ष परशुराम उपरकर आणि जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी आज दिली. तसेच या महोत्‍सवाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च रोजी मालवण धुरीवाडा येथे बैठक होणार आहे. या बैठकीला गाबीत बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्‍यांनी केली.
परशुराम उपरकर म्‍हणाले, ‘‘महाराष्‍ट्रासह गोवा, कर्नाटक आणि गुजराथ राज्‍याच्या किनारपट्टी भागात गाबीत समाज बाधंवांची वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात आरमारामध्ये सैनिक असेलल्‍या या समाजाने नंतर उदरनिर्वाहासाठी मच्छीमारी व्यवसाय स्वीकारला. या समाजाला एका छत्राखाली एकाच व्यासपीठावर एकत्र करुन गाबीत महोत्सव साजरा केला जाणार आहे.’’
चंद्रशेखर उपरकर म्‍हणाले, ‘‘गाबीत महोत्सवामध्ये मत्स्य पदार्थांची रेलचेल, तसेच मालवणी पारंपारिक खाद्य पदार्थ तसेच पारंपारिक मच्छिमारांची प्रात्यक्षिके, रोजगार प्रशिक्षण, पर्यटन परिसंवाद, पाककला स्पर्धा, सागरी सुंदरी स्पर्धा, नौकानयन, पोहोण्याची स्पर्धा, आणि क्रिकेट स्पर्धा होणार आहेत.’’
महोत्‍सवाच्या अनुषंगाने २४ मार्चला होणाऱ्या बैठकीला समाजातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, आजी माजी सरपंच, पंचायत समिती सदस्य, जि. प. सदस्य, संस्था प्रतिनिधी, नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन परशूराम उपरकर व चंद्रशेखर उपरकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: कायद्याचा हेतू वेश्यांना गुन्हेगार ठरवणं नाही, तर तस्करी आणि शोषण रोखणं आहे, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Vidhan Parishad Election : भाजपच्या दबावतंत्रापुढे शिंदेसेना झुकली? अखेरच्या क्षणी उमेदवार बदल; कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब?

फुटबॉल चाहत्यांसाठी गुडन्यूज! अखेर FIFA World Cup चे सामने भारतात दिसणार; कोणासोबत अन् किती रुपयांची झाली डील?

'या' अभिनेत्याने रणवीर सिंहला मारली होती तब्बल 24 कानशिलात! कॅमेऱ्यात कैद झाली घटना; नेमकं काय घडलं होतं?

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. चंद्रकांत लिमये यांचं निधन; कौटुंबिक सहलीदरम्यान घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT