कोकण

रत्नागिरी- दिव्यांगांसाठी तीन व्हीलचेअर प्रदान

CD

-rat१६p३२.jpg-KOP२३L८९५१४
रत्नागिरी ः आरएचपी फाउंडेशनतर्फे जिल्हा रुग्णालयात दिव्यांग विभागाला व्हीलचेअर प्रदान करताना सादिक नाकाडे व सहकारी.


जिल्हा रुग्णालयात तीन व्हीलचेअर प्रदान

रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग विभागाला रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे (आरएचपी फाउंडेशन) तीन व्हीलचेअर सुपूर्द करण्यात आले. या व्हीलचेअरचा उपयोग जिल्हा रुग्णालयात तपासणी, विविध प्रमाणपत्रांसाठी येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठी होणार आहे.
जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग विभागात दर बुधवारी आणि शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अपंगांची तपासणी करून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र काढून देण्यात येते. दिव्यांग व्यक्ती खूप लांबून वेळ काढून येते; पण त्यांना प्रमाणपत्र काढण्यासाठी रुग्णालयामध्ये केसपेपर, एक्स-रे काढण्यासाठी, गरजेप्रमाणे रक्ताच्या तपासण्या करण्यासाठी डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागते. काही दिव्यांग हातावर चालतात तर काहींना चालताही येत नाही. त्यांचे पालक त्यांना उचलून आणतात. अशा दिव्यांगांना सर्व विभागात फिरण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे त्यांचे प्रमाणपत्राचे काम एकाचवेळी पूर्ण होत नाही आणि त्यांना दोन-तीन हेलपाटे घालावे लागतात.
दिव्यांग विभागात व्हीलचेअरची कमतरता असल्याचे आरएचपी फाउंडेशनच्या अध्यक्ष सादिकभाई नाकाडे सदस्यांना जाणवले. दिव्यांगांचे आणि त्यांच्या पालकांचे खूप हाल होतात. दिव्यांगांचा त्रास कमी व्हावा आणि त्यांच्या पालकांचाही शारीरिक व अर्थिक त्रास कमी व्हावा या उद्देशाने व्हीलचेअर दिली. संस्थेने देणगीदार शोधून दिव्यांग विभागासाठी नवीन व्हीलचेअर मिळवून द्यायचे ठरवले. त्यामुळे दिव्यांगांना वेळेत प्रमाणपत्र काढून मिळण्यासाठी खूप फायदा होणार आहे. त्याप्रमाणे आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी देणगीदार मिळवून दिव्यांग विभागात तीन नवीन व्हीलचेअर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे सुपूर्द केल्या. त्या वेळी वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक अरुण खाकर, ऑर्थोपेडिक डॉ. मयूर कुंभार, फिजिओथेरपिस्ट डॉ. नितीन चौके आणि डॉ. अमित वायंगणकर, आरएचपी फाउंडेशनचे सदस्य समीर नाकाडे आणि प्रिया बेर्डे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचाही तडाखा बसणार, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

युद्ध थांबणं कठीण! इराणच्या अटी ठरू शकतात अडथळा, होर्मुझ टोल ते लष्करी तळ; अमेरिकेसमोर काय अटी?

Surat Station Redevelopment: A Boost for Mumbai-Gujarat Connectivity : मुंबई-सुरत लोकल सेवा सुरू होणार? सुरत स्टेशनवर सुरू असलेल्या 'या' कामांमुळे चर्चेला उधाण.

NRAI Demands Immediate Restoration of Commercial LPG Supply : एमएनजीएल (MNGL) पाईपलाईन आता वेगाने धावणार? हॉटेल उद्योगासाठी मोठी बातमी.

SCROLL FOR NEXT