कोकण

मुख्यमंत्र्याच्या साधेपणाचे दर्शन घडले

CD

rat१६३९.txt

-rat१६p२९.jpg ः
८९५११
हाच फोटो मंत्री उदय सामंत यांनी काढला.
-
मुख्यमंत्र्याच्या साधेपणा अन् सामंत यांची क्लीक

नीलेश सुर्वे ; मनीचे भाव मंत्र्यांनी नेमके ओळखले

गुहागर, ता. १६ ः सभागृह सुरू असतानाही १० मिनिटांचा वेळ काढून मुख्यमंत्री आम्हाला भेटायला आले. चार मित्रांनी सहज गप्पा माराव्यात अशी चर्चा केली. यात कुठेही आपण मुख्यमंत्री असल्याचा आव नव्हता. आमच्या मनातील भाव ओळखून मंत्री उदय सामंत यांनी मित्रत्वाच्या नात्याने मुख्यमंत्र्यांसोबत आमचा फोटोही काढला. असा अनुभव गुहागरचे भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी ''सकाळ''ला सांगितला.
सुर्वे म्हणाले, मंगळवारी (ता. १४) गुहागरच्या शहर विकास आराखड्याचा मुद्दा घेऊन आम्ही मुंबईत गेलो होतो. तेथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: संपर्क करून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची वेळ निश्चित केली होती. ठरलेल्या वेळेवर एक्स्प्रेस टॉवरमध्ये पालकमंत्री आले. भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याशी बोलले. गुहागरच्या विकास आराखड्यातील त्रुटी समजून घेतल्या. एवढे असेल तर केवळ पत्र नको आपण थेट मुख्यमंत्र्यांना भेटू असे सांगत आमच्यासमोर मुख्यमंत्री यांच्या पीएला फोन केला. विधानसभेत जाण्यासाठी दोन पास बनवून घेण्याची व्यवस्था केली. स्वत:च्या वाहनातून आम्हाला विधानसभेत नेले. तिथे मुख्यमंत्र्याच्या दालनात बसवून मंत्री उदय सामंत स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावण्यासाठी सभागृहात गेले. अवघ्या पाच मिनिटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दालनात आले आणि थेट ओळख करून गप्पा मारण्यास सुरवात केली. ते त्यांच्या दालनात टेबलाला टेकून उभे होते. उभ्या उभ्याच विकास आराखड्याचा विषय समजून घेतला. तिथूनच थेट राज्याच्या मुख्य सचिवांना संपर्क करून विकास आराखड्याला स्थगिती देण्याची सूचना केली.
दालनात आम्ही चौघेच होतो. मुख्यमंत्र्यासोबत एकतरी फोटो हवा असे आमच्या मनात येत होते. हे भाव मंत्री उदय सामंत यांनी ओळखून खरेकाका तुमचा मोबाईल द्या. मी फोटो काढतो, असे सांगितले. एका मंत्र्याला फोटो काढायला सांगणे पटत नव्हते. तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनीच आम्हाला फोटोसाठी उभे केले आणि पालकमंत्र्यांनी आमची भेट कॅमेरात बंद केली. कोणत्याही प्रकारचा अभिनिवेशन न बाळगता प्रेमळ मित्रासारखा गप्पा मारणारे मुख्यमंत्री आम्ही एकनाथ शिंदेंच्या रूपाने अनुभवले. त्याचबरोबर स्वत:च्या गाडीतून घेऊन जाणारे आमचे पास स्वत: बनवणारे आणि आमच्यासाठी मुख्यमंत्र्यांना सभागृहातून घेऊन येणारे पालकमंत्री उदय सामंत आम्ही याची देही याची डोळा अनुभवले. आपले मुख्यमंत्री, पालकमंत्री असे असू शकतात याचा विचारही आम्ही केला नव्हता. आजपर्यंतच्या छोट्याशा राजकीय जीवनातील ही भेट नक्कीच आमच्यासाठी अविस्मरणीय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Latest Marathi News Live Update: व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT