कोकण

परकीय वकिलांना भारताची कवाडे खुली

CD

परकीय वकिलांना भारताची कवाडे खुली

रत्नागिरी, ता. १७ ः बार कौन्सिल ऑफ इंडियाने परकीय वकील आणि कायदा क्षेत्रातील संस्थांना भारतातील प्रॅक्टिससाठी कवाडे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. परकीय कायदा, विभिन्न प्रकारचे आंतरराष्ट्रीय कायदे आणि आंतरराष्ट्रीय लवादाशी संबंधित प्रकरणातील सुनावणीमध्ये त्यांना सहभागी होता येईल. सर्व बाबींचा साकल्याने विचार करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे बार कौन्सिलने पत्रकात म्हटले आहे.
बार कौन्सिल ऑफ इंडियाने परकीय वकील आणि परकी विधी संस्थांसाठी नियमदेखील निश्चित केले आहेत. भारतीय विधी क्षेत्राची दारे परकीय वकील आणि संस्थांसाठी खुली केल्याने भारतातील वकिलांनाच याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कायदेशीर बाबी आणि खटले त्यामुळे वेगाने मार्गी लागू शकतील. या निर्णयामुळे भारताच्या विधी क्षेत्रावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही, अशी ग्वाही देऊन परकीय संस्थांवरदेखील योग्य पद्धतीने नियंत्रण ठेवता येईल, असेही बार कौन्सिलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे थेट परकीय गुंतवणुकीचा भारतातील प्रवाह वाढेल. भारत आंतरराष्ट्रीय वित्तीय लवादाचे हब बनेल, असेही सांगण्यात आले आहे. १४ लाख वकील असलेल्या भारत देशात या निर्णयाकडे मोठ्या अपेक्षेने व उत्सुकतेने पाहिले जाईल, असे मत येथील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. विलास पाटणे यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT