कोकण

खासदार राऊतांनी स्वतःचे राजकीय अस्तित्व जपावे

CD

89896
धोंडी चिंदरकर

खासदार राऊतांनी स्वतःचे
राजकीय अस्तित्व जपावे

चिंदरकर; राणेंवरील टिकेस प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ : भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे यांचा कुडाळ-मालवण मतदारसंघातील विजय जनतेने निश्चित केला आहे. त्यामुळे भाजपाच्या जीवावर ज्यांनी खासदारकीचे पाऊल टाकले, त्या खासदार विनायक राऊत यांनी स्वतःची राजकीय चिंता करावी, अशी टीका भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केली.
खासदार राऊत यांनी एका कार्यक्रमात नीलेश राणे यांच्यावर टीका केली होती. या टिकेला उत्तर देताना चिंदरकर यांनी नीलेश राणेंच्या कामाचा धडाका पाहून राऊतांसारख्या अपयशी खासदाराच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यामुळे खासदारकीच्या शेवटच्या काळात ते बरळत असल्याचे म्हटले आहे. नीलेश राणेंना निवडून देण्यासाठी जनता सज्ज आहे. कूचकामी खासदारामुळे जनता त्रस्त असून प्रत्येक निवडणुकीत धडा शिकवत आहे, पुढेही शिकविल. उगाच नसलेले अवसान खासदार राऊतांनी आणू नये. प्रथम नीलेश राणेंसमोर कोणाला उभे करणार ते सांगावे. आमदार नाईक यांची कारकीर्द संपवण्याचा विडा आधीच उचलला आहे. ते इथल्या ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना माहीत झाले आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुमची पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेली दुकानदारी भंगारात गेली. त्यामुळे आता स्वतःची राजकीय काळजी घ्यावी. नीलेश राणे आमदार होणे ही औपचारिकता राहिली आहे. इथल्या जनतेचा त्यांना पाठिंबा दिला आहे. तुमचे पार्सल सव्याज परत मुंबईत पाठवण्यास भाजप कार्यकर्ता सक्षम आहे, असा टोलाही चिंदरकर यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT