कोकण

शिवसेना शोधणार का संकटातून संधी

CD

चौकशांचे राजकारण- भाग ३ लोगो

शिवसेना शोधणार का संकटातून संधी
आगामी निवडणुकीकडे लक्ष; कोकणातील शिवसेनेच्या नेत्यावर ठाकरेंची भिस्त
मुझफ्फर खानः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ः कोकणात शिवसेनेतील नेत्यांविरोधात ईडीचे राजकारण सुरू झाल्यानंतर शिवसेनेच्या अडचणी वाढणार की या संकटात उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते एक संधी शोधणार? ईडीच्या कारवाईचा आगामी निवडणुकीत नक्कीच कोणाला फायदा होईल, याची सर्वांना उत्सुकता आहे.
विरोधी पक्षातील नेत्यांना धमकावण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून ईडीचा वापर होतोय, हे आता सर्वश्रुत झाले आहे. केवळ विरोधी पक्षातील नेतेच नव्हे तर प्रशासन चालवणारे कर्मचारी व अधिकारीही ईडीच्या रडारवर आले. अधिकारी आपले ऐकत नाही म्हणून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात चौकशीचा ससेमिरा सुरू केल्याचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी पाहिले.
सत्ताधारी पक्षाचे हे उद्योग कोकणात सुरू झाल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या सोयीच्या ठिकाणी बदल्या करून घेतल्या. नेत्यांनी
आपली चौकशी होऊ नये यासाठी भाजपमध्ये तर काहींनी शिंदे गटात प्रवेश केला तर काहींनी विरोधी पक्षातील पदे सोडून केवळ सामाजिक कामात अग्रेसर राहण्याचा निर्णय घेतला. नेत्यांनी पक्ष बदलले असले तरी शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरेंबरोबर आहेत, अशी चर्चा गलोगल्ली सुरू आहे.
शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडील पक्षाचे नाव आणि चिन्ह गेले. एवढ्या मोठ्या संकटाचा सामना करत ते पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात नवीन समीकरणे जुळवत आहेत. शिवसैनिकांनी मनात आणले तर हे संकट सहानुभूतीत परावर्तित करू शकतात. शिवसेनेच्या केडरमध्ये ती ताकद आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, राजन साळवी, माजी आमदार संजय कदम यांच्यासारखे केडर बेसनेते अजूनही पक्षात आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या कोकणातील सभांना झालेली गर्दी, पक्ष फुटल्यानंतर निघालेल्या यात्रांना मिळालेला प्रतिसाद पाहता सामान्य शिवसैनिक अजूनही पक्षाबरोबर आहे. त्यामुळे ईडीच्या कारवाईचा निवडणुकीवर काय परिणाम होईल, हे आगामी काळात दिसेल.
(समाप्त)

कोट
कोकणातील मतदार शिवसेनेबरोबर भावनिकरित्या जोडलेले आहेत. त्यामुळे ईडीच्या कारवाईचा निवडणुकीत एक मुद्दा असेल. ठाकरे कुटुंबाने कोकणसाठी दिलेले योगदान मोठे आहे. भाजपने शिवसेना हे घर फोडण्याचे पाप केले. ईडीच्या माध्यमातून शिवसेनेचे नेते संपवण्यासाठी प्रयत्न केले. या कारवाईचा मतांवर नक्की परिणाम होईल. शिवसेनेचा भगवा कोकणासह महाराष्ट्रात फडकेल.
- विनायक राऊत, खासदार शिवसेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अभिषेक पोरेलचे आक्रमक अर्धशतक, दिल्लीच्या 120 धावा पार

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT