कोकण

चिपळुणला आज पर्यटन कार्यशाळा

CD

चिपळूणला आज पर्यटन कार्यशाळा

बाबा मोंडकर; उद्योगमंत्र्यांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ : पर्यटन विभाग भारत सरकार आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण येथे उद्या (ता. १९) पर्यटन कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेस राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली.
कोकणाचा पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकासासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. कोकणातील जलक्रीडा, न्याहरी निवास, कृषी पर्यटन, कल्चर टुरिझम, मेडिकल, हिस्ट्री टुरिझम क्षेत्रात कार्य करणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायवाढीसाठी आवश्यक असलेल्या शासकीय नियमावलीमध्ये बदल तसेच शासन व पर्यटन व्यावसायिक यांच्यात कोकण प्रांतात पर्यटन व्यवसायवाढीसाठी समन्वयाचे भाग म्हणून भारत सरकारच्या पर्यटन विभागाचे आदरातिथ्य आणि पाहुणचार या विषयावर उद्या सकाळी ९ ते ५ या वेळेत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन माऊली हॉल चिपळूण येथे केले आहे. उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुरत्न योजना सदस्य किरण सामंत उपस्थित राहणार आहेत. या पद्धतीची कार्यशाळा महासंघाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित केली होती. त्याला पर्यटन व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. या कार्यशाळेच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रात असलेल्या संधी, शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मोंडकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: रवींद्र जडेजाचा 'तो' फोटो, साक्षीची Video शूटींग अन् MS Dhoni फक्त रडायचाच बाकी होता, Viral Moment

MBA: नफा आणि निसर्ग दोन्ही महत्त्वाचे! MBA मध्ये 'कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी' आणि 'ग्रीन फायनान्स' या नव्या विषयांना मोठी मागणी

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण: आज 3.30 वाजता महत्त्वाची सुनावणी

Radhanagari Dam : राधानगरी धरण सेवाद्वार नूतनीकरणासाठी ८८ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता

Bilimora Waghai Railway: १०० वर्षांची ‘मिनी ट्रेन’ आजही धावते; बिलीमोरा-वाघई रेल्वे आदिवासींची जीवनवाहिनी

SCROLL FOR NEXT