कोकण

देवदेवस्कीच्या प्रकारातून दीड लाखाची फसवणूक

CD

देवदेवस्कीच्या प्रकारातून
दीड लाखाची फसवणूक
आठ वर्षापूर्वीची घटनाः आरोपीला १ वर्षांचा कारावास
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ः आठ वर्षापूर्वी घरातील माणसे आजारी पडतात हा देवदेवस्कीचा प्रकार आहे. यासाठी तंत्रमंत्र घराचे शुद्धीकरण करावे लागेल असे सांगून दीड लाख रुपयांचे दागिने घेऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने एक वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली.
मुश्ताक इसा काझी (वय ५२, रा. मजगाव, रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना २८ एप्रिल २०१६ घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार विलास शंकर तांबे (वय २१, रा. भावेआडाम-तांबेवाडी, रत्नागिरी) यांच्या घरातील माणसे आजारी पडतात ती बरेच औषधोपचार करुन बरे होत नाहीत असे सांगितले. त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन संशयित काझी यांनी यासाठी तुमच्या घराचे शुद्धीकरण करावे लागेल असे सांगून त्यांनी अंगावरुन नारळ, लिंबू, लाल कपडा, मुर्ती आदी साहित्य काढून देवदेवस्कीचा प्रकार केला व रोख १५ हजार रुपये, चार मंगळसुत्र, चार सोन्याच्या चेन, २ कानातील कुड्या व साखळी असे सोन्याचे दागिने असा १ लाख ५० हजार रुपयांचे दागिने शुद्धीकरणासाठी घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी विलास तांबे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध तक्रार दिली. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल एस. एल. पेढांमकर करत होते. तपासात पोलिसांनी संशयितास अटक करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. शनिवारी (ता. १८) या खटल्याचा निकाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती गोवेकर यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी अभियोक्ता अॅड. प्रज्ञा तिवरेकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला १ वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड व दंड न भरला चार महिने कैद अशी शिक्षा ठोठावली. या कामी पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड कॉ़न्स्टेबल दुर्वास सावंत व महिला पोलिस कॉन्स्टेबल संजीवनी मोरे यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT