कोकण

भारतीय बौद्ध महासभेच्या चौके शाखाध्यक्षपदी चौकेकर

CD

90104
विष्णू चौकेकर, संजय चौकेकर

भारतीय बौद्ध महासभेच्या
चौके शाखाध्यक्षपदी चौकेकर

मालवण, ता. १९ : भारतीय बौद्ध महासभा चौके गाव शाखेच्या अध्यक्षपदी विष्णू चौकेकर, तर सचिवपदी संजय चौकेकर यांची निवड करण्यात आली. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संस्थेशी संलग्न चौके गाव शाखेची बैठक काल (ता. १८) सम्यकनगर, समाज मंदिर येथे झाली.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष विद्याधर कदम, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर धामणकर, तालुका प्रभारी अध्यक्ष पुरुषोत्तम मालवणकर, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा चौके उपसरपंच पी. के. चौकेकर, ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, सदस्या अनिशा चौकेकर आदी उपस्थित होते. उर्वरित कार्यकारिणी अशी ः सरचिटणीस संजय चौकेकर, उपाध्यक्ष अनिता चौकेकर, खजिनदार कृष्णा चौकेकर, संघटक समीर चौकेकर, गजानन कदम, रुपेश जाधव, अनंत चौकेकर, नामदेव चौकेकर, आनंदी चौकेकर, सुबोधिनी चौकेकर, दीपाली कांबळे. या सर्व पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष कदम यांनी अभिनंदन करून मार्गदर्शन केले. संस्थेच्या कामाची पद्धत, धार्मिक विधींमध्ये झालेले बदल याबाबत धामणकर यांनी माहिती दिली. बुद्धवंदनेने सभेला प्रारंभ झाला. ज्येष्ठ सल्लागार पी. के. चौकेकर यांनी प्रास्ताविक केले. दुलाजी चौकेकर, पुरुषोत्तम मालवणकर यांनी नूतन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या. एम.ए. भाग १ इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल नेहा चौकेकर तसेच डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केल्याबद्दल सचिन चौकेकर यांचा सत्कार केला. सावित्री चौकेकर, वैजयंती चौकेकर, प्रज्ञा चौकेकर, सर्वेश चौकेकर, कुणाल चौकेकर आदी उपस्थित होते. विष्णू चौकेकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT