कोकण

स्व-स्वरूप संप्रदायातर्फे रत्नागिरीत

CD

rat२०१८.txt


रत्नागिरीत हिंदू नववर्ष स्वागत यात्रा

रत्नागिरी, ता. २० : जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज स्व- स्वरूप संप्रदाय जिल्हा सेवा समितीच्या वतीने येत्या बुधवारी (ता. २२) हिंदू नववर्षानिमित्त मारूती मंदिर ते राम मंदिरपर्यत नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रारंभ होईल.
नववर्ष स्वागतयात्रेत रत्नागिरी तालुक्याचा नमन खेळे (कृष्ण लीला) चित्ररथ व संत गाडगेबाबा व ग्रामस्वच्छता अभियान कलापथक, राजापूर तालुक्याचा ब्लड इन निड चित्ररथ, दापोली तालुक्याचे खालुबाजा कलापथक, संगमेश्वर तालुक्याचा गजानन महाराज देखावा चित्ररथ व रावण- तासे कलापथक, गुहागर तालुक्याचा संतांची मांदियाळ चित्ररथ व भजन कलापथक, चिपळूण तालुक्याचा धर्मक्षेत्र चित्ररथ व पालखी कलापथक, लांजा तालुक्याचा रामपंचायतन चित्ररथ व होळी कलापथक, खेड तालुक्याचा संजीवनी अभियान चित्ररथ, मंडणगड तालुक्याचा आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज देखावा, कार्यवाहक समितीकडून बारा बलुतेदार हा चित्ररथ आहे. जिल्हाभरातून कलशधारी महिला, गुढीधारी महिला, निशाणधारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ११ वाजता राममंदिर येथे आरती, श्रीक्षेत्र नाणीजधाम पीठाचे उत्तराधिकारी पपू कानिफनाथ महाराज यांचे ऑनलाईन प्रवचन, प्रसाद होऊन स्वागत यात्रेची सांगता होणार आहे. या स्वागतयात्रेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्व- स्वरूप संप्रदाय जिल्हा सेवा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs BSP: खेळ राजकारणाचा! भाजप नेत्याच्या लेकाला मायावतींच्या पक्षाचे तिकीट

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांना आलेली धमकी पोकळ; घाबरण्याची गरज नाही.. गृह मंत्रालयाची माहिती

World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Nashik Lok Sabha Constituency : नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांच्या दारी महाजन; बंद दाराआड सव्वा तास चर्चा

SCROLL FOR NEXT