कोकण

क्राईम

CD

rat२०२६.txt

(पान ३ साठी क्राईम)

दाम्पत्याने लांबविली दागिन्यांसह रोकड

रत्नागिरी : तालुक्यातील शिरगांव येथील घरातून दाम्पत्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली. हा प्रकार २१ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम पवार आणि स्मिता पवार (दोन्ही मुळ रा. किणी वठार हातकणंगले, कोल्हापूर सध्या रा. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पती पत्नीची नावे आहेत. त्यांच्या विरोधात मयेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
-
विजेच्या खांबावर आदळून दुचाकीस्वार ठार

रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथे दुचाकी विजेच्या खांबावर आदळून झालेल्या अपघातात चालक ठार झाला. ही घटना शनिवारी ( ता.१८) सायंकाळी घडली. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोज महादेव शिवगण (वय ३२, रा. शिवगणवाडी, मालगुंड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ते दुचाकी घेऊन वरवडे ते खंडाळा, असे जात होते. ते गुरववाडी येथील चढात आल्यावर दुचाकीसमोर अचानक बैल आडवा आल्याने त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या विजेच्या पोलवर आदळली.
-
शेतीचे साहित्य अज्ञाताने लांबविले

रत्नागिरी : तालुक्यातील टिके-शिंदेवाडी येथे शेती संरक्षणासाठी लावलेले साहित्य अज्ञाताने लांबवले. हा प्रकार शुक्रवारी १७ ते १८ मार्च या कालावधीत घडला. मोईन हाशम मसुरकर (वय २५, रा. शिंदेवाडी टिके, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मसुरकर यांची शिंदेवाडी येथे शेती आहे. शेती संरक्षणासाठी त्यांनी आपल्या शेतात काही साहित्य बसवलेले होते. ते अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT