कोकण

मंडणगड-काजू बागेतून 600 किलो काजूबिया चोरीला

CD

घराडी येथील बागेतून
६०० किलो काजूबिया चोरीस
मंडणगड ः तालुक्यातील घराडी येथील काजूच्या बागेतून झाडावरील व झाडाखाली पडलेल्या ६०० किलो काजूबियांची चोरी झाली. मंडणगड पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १६ ते १७ मार्च या कालावधीत घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रभाकर विनायक जोशी (वय ८९, रा. घराडी, ता. मंडणगड) यांची काजू, आंबा अशा अनेक विविध फळझाडे असणारी मोठी बाग घराडी येथे आहे. या बागेत काजूची लागवड असून त्यावर मोठ्या संख्येने काजू बिया लगडल्या होत्या. दोन दिवसांच्या कालावधीत चोरट्याने ८५ हजार २०० रुपयांच्या ६०० किलो वजनाच्या काजूच्या बिया चोरून नेल्या. प्रभाकर जोशी यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून करून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास मंडणगड पोलिस अमंलदार करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्हापुरात PM मोदींच्या भाषणाला सुरूवात

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला दुसरा धक्का! रोहितपाठोपाठ ईशान किशनही परतला माघारी

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

SCROLL FOR NEXT