कोकण

परजिल्ह्यातील 6 जणांच्या टोळीला अटक

CD

rat२१५२.txt

बातमी क्र. ५२ (पान ३ साठी)

फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक

उसगावमधील प्रकार ; सहा जणांना पोलिस कोठडी

दाभोळ, ता. २१ : प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेची माहिती देऊन उसगाव येथील महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या परजिल्ह्यातील टोळी विरोधात दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आले. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता गुरुवारपर्यंत (ता. २३) पोलिस कोठडीत सुनवाली.

पोलिसांनी दिलेली माहिती, दापोली तालुक्यातील उसगाव गणेशवाडी येथील ऐश्वर्या गणेश आग्रे यांच्या घरी १८ मार्चला सकाळ दोन अनोळखी महिला व एक पुरुष असे तिघे आले होते. त्यांनी आम्ही सरकारी कर्मचारी असून पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेची माहिती देवून ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही त्यांना ते सवलतीच्या दरात देणार आहोत. त्यांनी एका फॉर्ममध्ये माहिती भरून घेतली व १५ दिवसात गॅस सिलेंडर, शेगडी मिळणार असून वर्षाला ३ सिलेंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेसाठी फक्त ५०० रुपये भरावयाचे आहेत असे सांगून ८ महिलांकडून प्रत्येकी ५०० प्रमाणे ४ हजार रुपये त्यांनी गोळा करून महिलांची फसवणूक केली होती. या टोळीत ६ जण होते. त्यातील चौघे लगेच हाती लागले, तर दोघे पळून गेले होते. मात्र त्यांनाही नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. यात संगीता पवळे, सुनीता बादावत, ममता डांगरे, अशोक जोगदंड, श्यामसुंदर जौजाळ, विठ्ठल सलगर यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT