कोकण

दशावतार कलाकार, चित्ररथ लक्षवेधी

CD

90753
कणकवली : गुढी पाडव्यानिमित्त आज कणकवली शहरातून स्वागतयात्रा काढण्यात आली. (छायाचित्र : प्रथमेश जाधव)


दशावतार कलाकार, चित्ररथ लक्षवेधी

कणकवलीत नववर्षानिमित्त स्वागतयात्रा; महिलांची मोठी उपस्थिती


कणकवली, ता.२२ : हिंदू नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त आज शहरातून स्वागतयात्रा काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकाच्या साथीने निघालेल्या स्वागत यात्रेने कनकनगरी दुमदुमून गेली. या नववर्ष स्वागत यात्रेतील दशावतारी कलाकार, भारत माता चित्ररथ लक्षवेधी ठरले. महिला व पुरुष पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते.
नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या स्वागत यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यात्रेत आमदार नीतेश राणे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री, राजश्री धुमाळे, साक्षी वाळके, नगरसेवक संजय कामतेकर, संजय मालंडकर, सामाजिक कार्यकर्ते आनंद पारकर, दादा कोरडे, सुशील पारकर, नंदकुमार आरोलकर, सुनील सावंत, वैजयंती करंदीकर, मृणाल ठाकूर, दत्तप्रसाद ठाकूर, प्रतिभा करंबेळकर, हरीश गणपते, संदीप राणे, सत्यविजय जाधव, समर्थ राणे, श्रीधर मुसळे, सूर्यकांत मालवणकर आदी उपस्थित होते.
---
शोभायात्रेने कनकनगरी भगवी
शोभायात्रेतील सिंधुगर्जना ढोल पथकाने परिसर दणाणून गेला. पारंपारिक वेशातील स्त्री, पुरूष आणि भगवे ध्वज, चित्ररथ, वारकरी दिंडीमुळे शहर भगवेमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेली शोभायात्रा आप्पासाहेब पटवर्धन चौक, बाजारपेठमार्गे विद्यामंदिराच्या पटांगणावर पोहचली. शिवारा मंदिराजवळ शोभा यात्रेचा समारोप झाला. यावेळी ‘हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा संस्कृती’ याविषयी विवेक मुतालीक यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Pali Stray Dogs: पालीत भटक्या कुत्र्यांचा कहर; १० वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेला चावा

SCROLL FOR NEXT