कोकण

''उपचार माणुसकीचा''चे सावंतवाडीत प्रकाशन

CD

swt234.jpg
90813
सावंतवाडीः ‘उपचार माणुसकीचा’ पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रा. एम. व्ही. कुलकर्णी. बाजूला ॲड. संतोष सावंत, मोतिराम टोपले, भरत गावडे, डॉ. दीपक तुपकर, प्रा. दिलीप गोडकर, राजू तावडे, ॲड. अरुण पणदूरकर, सुभाष गोवेकर, विकास गोवेकर आदी.

‘उपचार माणुसकीचा’या दीर्घ काव्यसंग्रहाचेचे सावंतवाडीत प्रकाशन
गुढीपाडव्यानिमित्त केशवसुत कट्ट्यावर सोहळा; कोमसाप, सहयोग मंडळाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ः माजगाव हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोतिराम टोपले यांनी लिहिलेल्या ''उपचार माणुसकीचा'' या दीर्घ कथासंग्रहाचे प्रकाशन येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक एम. व्ही. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. येथील केशवसुत कट्टा येथे गुढीपाडव्यानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व माजगाव गरड येथील सहयोग ग्रामविकास मंडळ यांच्यावतीने प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोमसाप सावंतवाडी शाखाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, लेखक मोतिराम टोपले, सहयोग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिलीप गोडकर, कोमसापचे जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे, तालुका खजिनदार डॉ. दीपक तुपकर, ॲड. अरुण पणदूरकर, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, सुभाष गोवेकर, दीपक पटेकर, मंगल नाईक, संतोष पवार, सुहासिनी सडेकर, दत्ताराम सडेकर, तारिका टोपले, प्रदीप पियोळकर, विकास गोवेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अण्णा देसाई, अरुण मेस्त्री, दिलीप भाई, मुकुंद वझे, राजेंद्र बिर्जे, विलास पंडित, सोमनाथ जिगजींनी, बाळासाहेब नंदीहळी, सौ. कासार, प्रदीप ढोरे, शंकर प्रभू, प्रसाद टोपले, सौ. टोपले आदी उपस्थित होते.
यावेळी टोपले यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा. कुलकर्णी यांनी शास्त्र शाखेचा विद्यार्थी साहित्य क्षेत्रातही कौशल्य दाखवितो, हे कौतुकास्पद आहे. टोपले यांनी आपल्या दीर्घकथा मला वाचायला दिल्या आणि त्यामध्ये एक वास्तव्याचे भान दिसले. मी त्यांना हे पुस्तक स्वरुपात प्रकाशित करा, असे सुचविले आणि त्यांनी पुस्तकाची पहिली आवृत्ती सादर केली. त्यांनी लिहिते राहावे, असे आवाहन केले. लेखक टोपसे यांनी, एड्स संदर्भात जनजागृती आणि तरुण पिढी यापासून दूर राहावी, यासाठी लिखाण केले. एकांकिकाही सादर केल्या. दीर्घ कथासंग्रह लिहिताना अनेकांचे सहकार्य लाभले, असे सांगितले. भरत गावडे यांनी टोपले यांचा दीर्घकथा संग्रह वास्तव्याला धरून असा आहे. त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये माणुसकी आणि वास्तव्य दिसते, असे गौरवोद्गार काढले. प्रास्ताविकात कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष ॲड. सावंत यांनी, लिहित्या हातांना व्यासपीठ देऊन नवनवीन लेखक समाजासमोर आणावेत, हा कोमसापचा उद्देश आहे आणि त्या हेतूनेच या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. सहयोग ग्राम विकास मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेने टोपले यांचे हे पुस्तक लोकांसमोर आणण्याच्या दृष्टीने हा उपक्रम घेतला. नवोदित लेखकांनी सुद्धा असे लिहित राहावे. त्यांच्या पाठीशी कोमसाप सावंतवाडी शाखा सदैव राहील, अशी ग्वाही दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT