कोकण

अर्ज नूतनीकरणास 31 पर्यंत मुदतवाढ

CD

संक्षिप्त

अर्ज नूतनीकरणास
३१ पर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी ः भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी २०२२-२३ करिता महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज अद्याप नोंदणी झालेली नाहीत, अशा अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जांचे नूतनीकरण करणे तसेच महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज मंजुरीस पाठविण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली. याबाबत समस्या उद्भवल्यास अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. चिकणे यांनी केलेले आहे.

प्रशिक्षणार्थींना टॅबचे वाटप
सिंधुदुर्गनगरी ः इतर मागास व बहुजन कल्याण विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या संस्थेमार्फत जेईई, नीट, एमएचटी-सीईटी (JEE, NEET, MHT-CET) चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाचे सहायक लेखाधिकारी भालचंद्र कापडी उपस्थित होते. प्रशिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना टॅब, टॅब कव्हर तसेच दररोज ६ जीबी डाटासह सिमकार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी अनिल बोरीकर, अमोल श्रीमानवार, संतोष परुळेकर, सुनील बागुल, रवी जाधव, कलिंगण, मयूर कदम आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक आनंद कर्पे यांनी प्रास्ताविक केले. अनिल बोरीकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

SCROLL FOR NEXT