कोकण

कोकणातील आंबा राज्यातील बाजारांत

CD

कोकणातील आंबा
राज्यातील बाजारांत
सावंतवाडी, ता. २४ ः गुढीपाडव्यापासून आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. याच पार्श्वभूमीवर कोकणातील आंबा बाहेरील बाजारपेंठांमध्ये निर्यात केला जात आहे. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच परराज्यातून कर्नाटक आणि केरळ येथूनही आंबे येत असल्याचे दिसते.
कोकणातून विविध जातीचे आंबे राज्यातील इतर बाजारपेठांमध्ये दाखल झाले आहेत. रत्नागिरीचा हापूस आणि देवगड आंब्यांबरोबरच बाकी जातीच्या आंब्यांनाही चांगली मागणी आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो आंब्यांच्या पेट्या दाखल झाल्या आहे.
बाजारात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच परराज्यातून कर्नाटक आणि केरळ येथून आंब्याची आवक होत आहे. यंदा पहिल्या टप्प्यातील हापूस बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे. सध्या आंब्याचे दर चढे आहेत, पण आवक जशी वाढले तसे दर कमी होण्याचे संकेत विक्रेत्यांकडून दिले जात आहेत. अवकाळी पावसामुळे राज्‍यातील अनेक भागांतील आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. मोहोर गळून गेला आहे तर काही ठिकाणी फळगळती झाल्‍याने बागायतदार चिंतेत आहेत. त्‍यामुळे यंदा आंबा उत्‍पादन कमी होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT